शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

भर पावसाळ्यात विदर्भात २३८ टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 8:46 PM

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची सरासरी पार

अमरावती : यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात विभागात पावसाने सरासरी पार केली असली तरी अद्यापही संततधार नसल्याने भूजल पुनर्भरण झालेले नाही. जलप्रकल्पांमध्येही सरासरी २० टक्केच साठा आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत २३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत २०२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात २२५ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी ११० आहे. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी २८.८ आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १९९.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना २१३.६ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात १८० मिमी पाऊस अपेक्षित असताना २४४.२ मिमी पाऊस कोसळला. यवतमाळमध्ये पावसाची २३५.४ मिमी सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात २२९.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात १८१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, विभागातील सर्वात कमी १०५ मिमी पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात २१३.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, विभागातील सर्वात जास्त ३३३ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १५६ आहे.बंगालच्या उपसागरात ९ ते ११ व १३ ते १५ जुलै या दरम्यान कमी दाबाचे दोन टप्पे अथवा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसानेही या आठवड्यात ६२ टँकर कमी झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टँकरअमरावती विभागात सद्यस्थितीत ३७ तालुक्यांतील २६० गावांमध्ये २३८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ८८ गावांमध्ये ९१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात ७३ गावांत ६३, अकोला जिल्ह्यात ५७ गावांमध्ये ४२, वाशिम जिल्ह्यात २३ गावांमध्ये २१, तर अमरावती जिल्ह्यात १९ गावांमध्ये १३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  ४८५ प्रकल्पांमध्ये २१ टक्केच जलसाठा  विभागातील ४८५ जलप्रकल्पांमध्ये सध्या २१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, परिस्थिती फारच भीषण आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये २५.१८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये २३.०९ टक्के, तर ४५२ लघु प्रकल्पांमध्ये १४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे.