पाण्याचा योग्य सन्मान व्हावा

By Admin | Updated: June 6, 2017 01:52 IST2017-06-06T01:52:54+5:302017-06-06T01:52:54+5:30

औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे

The water should be respected | पाण्याचा योग्य सन्मान व्हावा

पाण्याचा योग्य सन्मान व्हावा

जलतज्ज्ञ राजेंद्र्र सिंग : पर्यावरण दिनानिमित्त तज्ज्ञांचे विचारमंथन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे याकरिता शासनावर अवलंबून न राहता ही लोकचळवळ व्हावी, असे मत प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र्र सिंग यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने महानिर्मितीच्यावतीने औष्णिक वीज केंद्र्रातील रसायनशास्त्र व शाश्वत पर्यावरण या विषयावर हॉटेल तुली इम्पिरियल येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर, मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य महाव्यवस्थापक नितीन वाघ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, श्रीपाल सिंग, दौलत शिवणकर, डॉ. विजय येऊल प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. राजेंद्र्र सिंग म्हणाले की, पावसाच्या पॅटर्नची पिकांच्या पॅटर्नसोबत सांगड घातली तर उत्पादन वाढेल. निसर्गाचे शोषण न करता पोषण केल्यास विकास साधता येईल. राजस्थानमध्ये जलक्रांती घडवून आणल्याचे त्यांनी उदाहरणासह अनेक दाखले दिले. पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा शांत गुणधर्म आहे, पाणी एकमेकांना जोडण्याचे काम करते, त्यामध्ये विनम्रता आहे, त्याचा योग्य सन्मान केला पाहिजे, पाण्याची १० वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली.
यावेळी महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, महानिर्मितीचे मुख्य अभियंते प्रदीप शिंगाडे,अनंत देवतारे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, सुनील आसमवार, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) रानडे, उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मोहन आव्हाड, शांताराम पौनीकर, अधीक्षक अभियंते डॉ. अनिल काठोये, श्याम राठोड, अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ विवेक घोडमारे, संदेश मोरे, सुरेंद्र निशानराव, शशिकांत वेले आदी उपस्थित होते. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर यांनी महानिर्मितीच्या विविध क्षेत्रातील वाटचालीबाबत उपस्थितांना माहिती दिली. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. मनीषा बोरीकर यांनी तर दौलत शिवणकर यांनी आभार मानले.

कार्यक्षमता वाढ व स्थिरता
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘कार्यक्षमता वाढ व स्थिरता’ या विषयावर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, ‘सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उद्योगात वापर’ यावर आनंद आभारे , डॉ. साधना रायलू, डॉ. श्रीपाल सिंग, श्रीनिवास नागराजन, डॉ. सीमा श्रीवास्तव, डॉ. टी.डी. कोसे, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.पद्मा राव यांनी अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले.

Web Title: The water should be respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.