नाला बुजविल्यामुळे पाणी शेतात शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:51+5:302021-07-28T04:08:51+5:30
वाडी: खडगाव येथील गावालगत असलेला नाला खुर्ची बनविणाऱ्या आचल कंपनीने बुजविल्यामुळे पावसाळ्यातील वाहते पाणी शेतात शिरून परिसराला तलावाचे स्वरूप ...

नाला बुजविल्यामुळे पाणी शेतात शिरले
वाडी: खडगाव येथील गावालगत असलेला नाला खुर्ची बनविणाऱ्या आचल कंपनीने बुजविल्यामुळे पावसाळ्यातील वाहते पाणी शेतात शिरून परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी आ. समीर मेघे, नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
खडगावस्थित आचल खुर्ची कंपनीचे मालक शैलेंद्र अग्रवाल यांनी गावालगत असलेला वाहता नाला बुजविल्यामुळे पावसाळ्यातील वाहते पाणी शेतात जमा होत आहे. नैसर्गिकरीत्या बनलेला नाला व त्यालगत असलेली पांदण पूर्णपणे बुजविल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात
शेतकरी नानाजी ठाकरे, अतुल मांडवगडे, योगेश जोगी, संजय झाडे, शंकर ठाकरे, भुजंग गोमकर, कवडू जोगी उपस्थित होते.
250721\1309img-20210725-wa0134.jpg
फोटो