शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गोसेखुर्द प्रकल्पासाठी जल आयोगाकडून ७५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:25 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ ४गोसेखुर्द प्रकल्पामधून तीन जिल्ह्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील २२९९७ हेक्टर सिंचन क्षमतेपैकी १३६९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील ८७६४७ क्षमतेपैकी २४३मुख्यमंत्र्यांची प्राथमिकता या प्रकल्पाचे काम नियोजित आराखड्यानुसार पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे. गोसेखुर्द प्रकल्प नऊ घटक मिळून तयार झाला असून यामध्ये मुख्य धरण, चार उपसासिंचन यशेतकऱ्यांना मिळेल थेट पाणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पालासाठी केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटींचा निधी उपलब् ध केला आहे. यामुळे प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे. ४२१ कोटींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यकालव्यातून बंद नलिकांव्दारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नेण्यात येणार आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील ३०६००हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून ६२२६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. वितरिकेची कामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून २०२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ४या प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत आहे. भातासह इतर पीकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्व विदभार्साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे ७१८१० हेक्टर सिंचन निर्माण होणार असून त्यापैकी १३९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा १३ किलोमीटरचा असून यामधून ३१५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी १० ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. ४३ किलोमीटर मुख्य कालव्यातून १२३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.चार उपसा सिंचन योजना४या प्रकल्पावर चार उपससिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर ७७१० हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर १११९५ हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, तसेच अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी दिली.प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे४डिसेंबर २०१७ पर्यंत ९४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा व आॅक्टोबर २०१८ पर्यंत ११४६ दलघमी पूर्ण पाणीसाठा निर्माण करणे.४धरणाचे सांडव्यामधील चार बांधकाम विमाचके बंद करण्याचे काम पूर्ण करणे.४मोखाबर्डी उपसासिंचन योजना कार्यान्वित करून १४९८ हेक्टर व जून २०१८ पर्यंत अतिरिक्त ७२५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे.४बंदनलिकेद्वारे ४२२०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करणे.४कालव्यावरील पाच उपसासिंचन योजना जून २०१९ पर्यंत पूर्ण करणे. 

टॅग्स :Waterपाणी