शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प.च्या सर्वसाधारण सभेत पेटले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:13 IST

सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देअधिकारी-पदाधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी सांगितले की, पाणीटंचाई उपाययोजनेंतर्गत जिल्ह्याला तीन टप्प्यामध्ये ६२३ वर बोअरवेल मंजूर आहेत. आज निम्मा उन्हाळा संपुष्टात आल्यानंतरही जिल्ह्यात मंजूर बोअरवेलपेक्षा निम्म्याही बोअरवेलची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ १५१ इतक्याच बोअरवेलची कामे पूर्ण झाली आहेत. तर यातील बोटावर मोजण्याइतपतच बोअरवेलला हॅन्डपंप बसविण्यात आले असून, या बोअरवेलच्या पाण्याचा नाममात्र नागरिकांनाच फायदा होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व गोष्टीसाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही जबाबदार आहेत. अध्यक्षांनी भीषण टंचाई लक्षात घेता टंचाईच्या काळात एकही आढावा सभा घेतली नाही किंवा टंचाईग्रस्त गावे, तालुक्यांना अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी भेटी घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडून ही कृती करण्यात आली नाही. पदाधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष असल्यामुळे अधिकाऱ्यांनीही आपल्या मनमर्जीपणाने कामे सुरू ठेवलीत व याचा फटका म्हणजे ग्रामीण जनतेला पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख टाकळीकर यांनी आजवर टंचाई उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामासोबतच करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सभागृहातील सदस्यांना दिली.सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी टंचाईच्या दृष्टिकोनातून जि.प.प्रशासनाने करावयाची उपाययोजना ही आज करण्यापेक्षा पूर्वीच का केली नाही? असा सवाल यावेळी उपस्थित केला. यावेळी भारती गोडबोले, मनोज तितरमारे, नंदा नारनवरे, उज्ज्वला बोढारे, सुरेंद्र शेंडे, नाना कंभाले, वंदना पाल, शांता कुमरे, नंदा लोहबरे, बबीता साठवणे, छाया ढोले आदी सत्तापक्ष व विरोधी पक्षातील सदस्यांनी पाणीप्रश्नावर आपापल्या सर्कलमधील गाऱ्हाणी सभागृहात मांडून, पदाधिकारी व अधिकाऱ्यांना यावर तोडगा काढण्याची मागणी केली.कुही, भिवापूर, रामटेकमध्ये एकही बोअरवेल नाहीसदस्या नंदा नारनवरे म्हणाल्या, भिवापूर तालुक्यात कुठलीच नदी, तलाव नाही. यामुळे येथील जनतेला पाण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांवर निर्भर राहावे लागते. मात्र, यानंतरही अद्यापपर्यंत भिवापूर तालुक्यात एकाही बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाली नाही. शांता कुमरे म्हणाल्या, रामटेक तालुक्याच्या एसडीओंनी जि.प.कडे चुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्या प्रस्तावात तालुक्याला पाणीटंचाई उपाययोजनेच्या अनुषंगाने कुठलीच आवश्यकता नसल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, वस्तुस्थितीत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, येथे टंचाई उपाययोजनांची कामे मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. तर तितरमारे म्हणाले की, निम्मा उन्हाळा संपुष्टात येऊनही कुही तालुक्यात एकाही बोअरवेलचे काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरWaterपाणी