रेती चोरीवर ‘जीपीएस’ प्रणाली ठेवणार वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:08 IST2017-08-22T00:07:59+5:302017-08-22T00:08:19+5:30
रेती व गौण खनिज वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली बसविण्यात येत असून ....

रेती चोरीवर ‘जीपीएस’ प्रणाली ठेवणार वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेती व गौण खनिज वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली बसविण्यात येत असून या प्रणालीमुळे अवैधरीत्या वाहतूक करणाºया वाहनांचा शोध घेणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम १५ वाहनांवर ही प्रणाली बसविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिली.
या प्रणालीमुळे अवैध रेती वाहतुकीची माहिती तात्काळ उपलब्ध होईल. त्यादृष्टीने सर्वप्रथम १५ वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यानंतर रेती व गौण खनिजाची वाहतूक करणाºया सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. खाणपट्टेधारक, तसेच रेतीचा अधिकृत परवाना असलेल्या धारकांनी वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या सर्व वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात अधिकृत खाण पट्टेधारकांची संख्या ११६ तर रेती पट्टेधारकांची एकूण संख्या ३६ असून सर्वांना जीपीएस प्रणाली असलेल्या वाहनातूनच वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाने रेतीच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी तीन महिन्यात धोरण ठरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात प्रथम जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे.
ड्रोनचा प्रभावी वापर
रेतीची अवैधपणे उत्खनन करणाºयाविरुद्ध आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ड्रोन कॅमेराद्वारे रेतीघाटांवर नियंत्रण ठेवण्यात येत असून मागील वर्षी या प्रणालीमुळे चार रेतीघाट रद्द करण्यात आले आहे, हे विशेष.