लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील लाहोरी डीलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंट यांच्याकडे मालमत्ता कर २००८ सालापासून थकीत आहे. ३.८३ लाखांची थकबाकी न भरल्याने धरमपेठ झोनच्या पथकाने गुरुवारी वॉरंट बजावण्याची कारवाई केली.गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील घर क्रमांक ९७/८, ९७/८/१, ९७/७ ९७/७ बी आणि ९७/बी/४ येथे लाहोरी डीलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंट आहे. मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही थकबाकी न भरल्याने झोनचे पथक वॉरंट घेऊ न पोहचले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने दोन-तीन दिवसाची मुदत मागितली. परंतु पूर्वानुभव लक्षात घेता ही मागणी धुडकावली. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देताच २.७० लाखांचा धनादेश देण्यात आला. तसेच उर्वरित थकबाकी १५ दिवसात भरण्याची हमी दिली. ही कारवाई झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक गोपल रुसिआ, धनराज हेमाने, अरविंद ढवळे, अशोक खेडकर, दीपक स्वामी, अरूण मेहरुलीया, प्रसाद चेपे यांच्यासह कर विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.
नागपूरच्या लाहोरी डीलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंटवर वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 21:31 IST
महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील लाहोरी डीलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंट यांच्याकडे मालमत्ता कर २००८ सालापासून थकीत आहे. ३.८३ लाखांची थकबाकी न भरल्याने धरमपेठ झोनच्या पथकाने गुरुवारी वॉरंट बजावण्याची कारवाई केली.
नागपूरच्या लाहोरी डीलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंटवर वॉरंट
ठळक मुद्देधरमपेठ झोनची कारवाई : २.७० लाखांची वसुली