नागपूरसह विदर्भात हलका ते मध्यम पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:22+5:302021-06-20T04:07:22+5:30
नागपूर : हवामान विभागाने या आठवड्यात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागपुरात मागील २४ तासांत पावसाचा ...

नागपूरसह विदर्भात हलका ते मध्यम पावसाचा इशारा
नागपूर : हवामान विभागाने या आठवड्यात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागपुरात मागील २४ तासांत पावसाचा जोर मंदावला आहे. विदर्भातील एक-दोन जिल्हे वगळता मागील आठवड्याच्या तुलनेत बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्यासारखा दिसत आहे.
नागपूर शहरात शनिवारी तापमान किंचित ०.१ अंश सेल्सिअसने वाढून ३३.१ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे. सकाळी आर्द्रता ९० टक्के होती. सायंकाळी थोडी घट होऊन ती ८० टक्के नोंदविण्यात आली. शहरात मागील २४ तासांत १.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी दुपारी पावसाचे वातावरण होऊनही पाऊस आला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याची माहिती आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दर्शविण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा या तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मागील २४ तासांत अमरावतीमध्ये ५.८ मि.मी., गडचिरोली १.४, गोंदिया १०.२, वाशिम येथे ०.२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.
...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३५.० : २४.५
अमरावती : ३२.४ : २२.५
बुलडाणा : २९.२ : २३.२
चंद्रपूर : ३३.४ : २४.६
गडचिरोली : ३२.२ : २६.०
गोंदिया : ३०.४ : २३.२
नागपूर : ३३.१ : २४.४
वर्धा : ३२.५ : २५.२
वाशिम : ३१.० : अप्राप्त
यवतमाळ : ३२.२ : अप्राप्त
...