शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करण्याचा सल्ला; जूनमध्ये पाऊस रखडणार

By शुभांगी काळमेघ | Updated: May 28, 2025 18:02 IST

पावसाच्या घाईत पेरणी नको: विदर्भात शेतकऱ्यांना मोठा इशारा!

शुभांगी काळमेघ नागपूर : विदर्भात यंदा मान्सून थोडा लवकर दाखल झाला असला, तरी पावसाचे प्रमाण अजूनही स्थिर नाही. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, पण हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस ‘मान्सूनपूर्व’ असून, यावर विश्वास ठेवून पेरणी करणे धोका पत्करण्यासारखे ठरू शकते.

काय आहे धोका?हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील शेतकऱ्यांनी जर आताच पेरणी सुरू केली, तर पुढील आठवड्यात पावसाची विश्रांती पडल्यास उगवलेले पीक कोरड्या हवामानामुळे नष्ट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

मृग नक्षत्राची वाट पाहा!८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार आहे. त्या काळात हवामान खात्याने अधिक स्थिर व नियमित पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, मृग नक्षत्रातच पेरणी करावी. किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करणे शहाणपणाचे ठरेल.

कृषी विभागाचा सल्ला

  • पावसावर भरवसा ठेवा, पण योग्य वेळेची वाट पहा
  • हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या
  • जमीन ओलसर असेल तेव्हाच पेरणी करा

शेतकऱ्यांनी सध्या हवामानाची स्थिती लक्षात घेऊन, घाई न करता, वैज्ञानिक पद्धतीने व वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. चुकीच्या वेळी पेरणी केल्यास, शेतीचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भfarmingशेतीFarmerशेतकरीAkolaअकोलाnagpurनागपूर