शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वर्धा जिल्हा बँकेची तीन महिन्यात फेरचौकशी; दोषींवर गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:07 IST

आॅनलाईन लोमकतनागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेला घोटाळा गुरुवारी विधानसभेत गाजला. या घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात असल्याचे सांगत, पुन्हा चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी लावून धरली. याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तीन महिन्यात फेरचौकशी करण्याची घोषणा केली. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही ...

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

आॅनलाईन लोमकतनागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेला घोटाळा गुरुवारी विधानसभेत गाजला. या घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात असल्याचे सांगत, पुन्हा चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी लावून धरली. याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तीन महिन्यात फेरचौकशी करण्याची घोषणा केली. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी सांगितले.भाजपाचे डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत, वर्धा जिल्हा जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहारामुळे वर्धा जिल्हा परिषदेचे ९५ कोटी रुपये तर २ लाख ४० हजार खातेधारकांचे सुमारे ३५० कोटी रुपये बँकेत अडकून पडले असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक विविध तातडीच्या कामासाठी आपले पैसे काढण्यासाठी बँकेत जातात तेव्हा त्यांना रक्कम दिली जात नाही. त्यामुळे स्वत:च्या हक्काच्या पैशापासून ठेवीदार वंचित झाले असल्याचे सांगत, सरकारने यावर उपाय योजण्याची मागणी केली. सुधाकर कोहळे, वीरेंद्र जगताप यांनीही संबंधित मागणी लावून धरली. या बँकेची सरकारतर्फे चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, २००८ मध्ये तत्कालीन सरकारने चौकशी थांबविली, असे सांगत पुन्हा चौकशी करण्याची मागणी अतुल भातखळकर व सुधाकर कोहळे यांनी केली. समीर कुणावार यांनी जिल्हा बँक राज्य बँकेत विलीन करण्याची मागणी केली. सदस्यांची मागणी विचारात घेता, सहकारमंत्री देशमुख यांनी तीन महिन्यात फेरचौकशी करण्याची घोषणा केली.देशमुख यांनी सांगितले की, बँकेचे एकूण २ लाख १९ हजार ४०९ ठेवीदार असून, एकूण ३६४.२२ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत १.३४ कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. सद्यस्थितीत ठेवींच्या ५ टक्के व जास्तीत जास्त १५ हजार रुपये ठेवीदारांना परत केले जात आहेत. मुदतठेवींवर २५ टक्के व जास्तीत जास्त ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. वर्धा जिल्हा परिषदेच्या बँकेत ९३.९२ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. त्यापैकी ६.२५ कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. बँकेत १७० कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे नोव्हेंबर २०१७ चे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Subhash Deshmukhसुभाष देशमुख