शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या गर्दीवर 'वॉर रूम'मधून उतारा, प्रवाशांच्या समस्येचा तत्परतेने होणार निपटारा

By नरेश डोंगरे | Updated: June 16, 2024 20:45 IST

विभागीय व्यवस्थापकांचे राहिल 'वॉर रूम' वर लक्ष

नागपूर: रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी रेल्वेे प्रशासनाने 'वॉर रूम' निर्माण केली आहे. २४ तास सुरू राहणाऱ्या या वॉर रूम मधून प्रवाशांच्या प्रत्येक अडचणीला तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. अतिरिक्त गाड्या, अतिरिक्त कोच लावूनही गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. अशात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे गाड्यांना विलंब होण्याचे, गाड्या रद्द केल्या जाण्याचे प्रकारही सुरू आहे. त्यामुळे गर्दीत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. त्यासंबंधाने तक्रारी आणि ओरडही होते. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती देण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनाही जाहिर केल्या जात असतात.

आता अशीच एक उपाययोजना रेल्वेने जाहिर केली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्रवाशांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे, या रूममध्ये विद्युत विभाग, परिचालन विभाग, वाणिज्य विभाग आणि यांत्रिकी विभागाचे अधिकारी-कर्मचारी बसणार आहेत. ही वॉर रूम २४ तास कार्यरत राहणार असून कुठे कोणती समस्या किंवा अडचण आहे, त्याची माहिती किती वाजता मिळाली आणि ती अडचण किती वेळेत दूर करण्यात आली, त्यासंबंधीचा लेखाजोखा वॉर रूममधून वरिष्ठांना पाठविला जाणार आहे. रूमच्या कार्यप्रणालीवर मिनट टू मिनट विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल लक्ष ठेवणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.'मी तुम्हाला मदत करू शकतोउपरोक्त उपाययोजना करतानाच रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी बूथ निर्माण करण्यात आले आहे. येथील कर्मचारी अडचण घेऊन येणाऱ्या प्रवाशांना 'मी तुम्हाला काय मदत करू शकतो, असा प्रश्न करून प्रवाशांची अडचण सोडविण्याचे प्रयत्न करणार आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेगाड्यांमध्ये तिकिट तपासणीस आणि आरपीएफची स्पेशल टीम तयार करण्यात आली असून, ही टीम स्लीपर तसेच जनरल कोचमध्ये गर्दी वाढणार नाही, याची काळजी घेणार आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर