शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 23:10 IST

 Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची ५१% मते मिळाली, मविआ केंद्र सरकारच्या योजना बंद पाडणार असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.

 Chandrashekhar Bawankule ( Marathi News ) : वक्फ बोर्डाने तात्कालीन कायद्याचा आधार घेत किंवा वक्फचा वापर करून हिंदू, आदिवासी व खासगी जमिनीवर अतिक्रमण केले. त्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावाने करून घेतल्या. अशा सर्व जमिनींबाबत तातडीने योग्य ती कारवाई करून त्या ज्या व्यक्ती, मंदिर किंवा संस्थांच्या मालकीच्या आहेत त्यांना त्या परत कराव्यात. त्यासाठी रेकॉर्ड दुरुस्त करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

वक्फ बोर्ड कायद्यात तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी उच्च स्तरीय समिती किंवा प्राधिकरण गठित करावे व त्यासाठी लागणारा पैसा सरकारने खर्च करावा, असेही बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली. 

मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मतदानानंतर बुथ लेव्हलवरून जो रेकॉर्ड मिळाला त्यानुसार उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या मतदानापैकी ५१% वाटा हा मुस्लिम मतदारांचा आहे. मागील दोन अडीच वर्षांत त्यांनी जी हिंदुत्व विरोधी भूमिका स्वीकारली त्या भूमिकेतून हे मतदान मिळाल्याचा अभिमान त्यांना असेल तर ते त्यांना लखलाभ असो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व पाहून वाईट वाटत असेल. बाळासाहेबांच्या विचारांसोबत मोठा दगा-फटका होत आहे, असंही बावनकुळे म्हणाले. 

जनता काँग्रेस कार्यालयापुढे रांग लावणार 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक दल थोड्याशा यशाने हुरळून गेले आहेत. महायुती आणि मविआच्या मतांमध्ये केवळ ०.३ टक्के फरक आहे. याचमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी उत्साह आला आहे. पाच मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडे जाहीर झालेले आहेत. पुढील पाच वर्षात मोदी सरकारच्या योजना महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेपर्यंत पोहोचाव्यावा यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आवश्यक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर केंद्रातील एनडीए सरकारच्या सर्व योजना बंद करणे हा एकच अजेंडा असेल. त्यामुळे मविआला महाराष्ट्र मतदान करणार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने  खोटे बोलून जाहीर केलेले ८५०० रुपये मागण्यासाठी जनता काँग्रेस कार्यालयासमोर रांगा लावतील असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. 

खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत बावनकुळे म्हणाले की, समाजात कोणत्याही प्रकारची कुठेही तेढ निर्माण होणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्व काम करीत आहोत. दंगली घडविण्याचे  काम महाराष्ट्रात शरद पवारांच्या तर देशात काँग्रेसच्या काळात झाले आहे. भाजपाच्या काळात दंगली होत नाहीत तसा विचारही कुणी करीत नाही, असंही बावनकुळे म्हणाले.  

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा