शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मुंबईतील वॉन्टेड शूटर अटकेत

By admin | Updated: December 12, 2015 05:33 IST

गुन्हेशाखेच्या पथकाने मोमिनपुऱ्यातील एका गेस्टहाऊसमध्ये शुक्रवारी पहाटे एक विशेष आॅपरेशन राबवून मुंबईतील

गुन्हेशाखेचे मोमिनपुऱ्यातील गेस्ट हाऊसमध्ये आॅपरेशन : पिस्तूल, रोकड, सोने जप्तनागपूर : गुन्हेशाखेच्या पथकाने मोमिनपुऱ्यातील एका गेस्टहाऊसमध्ये शुक्रवारी पहाटे एक विशेष आॅपरेशन राबवून मुंबईतील तीन ‘वॉन्टेड शूटर’ पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, सुरा, दीड लाखाची रोकड, सोने आणि अन्य चीजवस्तूंसह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद शोएब शौकत अली मंसूर (नल बाजार मुंबई), राहुल रमेश पवार (भरतवाडा, मालेगाव) आणि संजयकुमार महंती (नालासोपारा) अशी या तिघांची नावे आहेत. ते अंडरवर्ल्डशी किंवा मुंबईतील कुण्या डॉनशी संबंधित आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.या तिघांनी दक्षेस कांतीलाल शहा नामक व्यापाऱ्यावर ५ नोव्हेंबरला फायरिंग करून रक्कम लुटली होती. ही रक्कम हवालाची असल्याची टीप मिळाल्याने आरोपींनी शहाकडून रोकड असलेली बॅग हिसकावण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तिघांची ओळख पटविल्यानंतर मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत होते. राज्यभरातील पोलिसांना मुंबई पोलिसांनी या तिघांची माहिती देऊन त्यांना ‘वॉन्टेड‘ घोषित केले होते. हे तिघे नागपुरात दडून बसल्याची माहिती कळल्यानंतर एपीआय दहीफळे यांच्या नेतृत्वात अंधेरी पोलिसांचे एक पथक नागपुरात आले. गुरुवारी रात्री त्यांनी स्थानिक वरिष्ठांची भेट घेऊन या फरार आरोपींबाबत माहिती दिली. त्यावरून पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पथक या तिघांचा मोमिनपुऱ्यात रात्रभर शोध घेत होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर सेलचे तज्ज्ञांनी पहाटे २ वाजता आरोपींचे ‘लोकेशन ट्रेस’ केले. ते मोमिनपुऱ्यातील अल कदिर गेस्ट हाऊसमध्ये असल्याची खात्री पटताच गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कातकडे, चंद्रशेखर ढोले, महल्ले, सहायक निरीक्षक अतुलकर, सचिन लुले यांनी मोठा पोलीस ताफा घेऊन शुक्रवारी पहाटे गेस्टहाऊसला गराडा घातला. हे तिघेही खतरनाक गुन्हेगार असल्याचे लक्षात घेता पोलिसांनीही तयारीनिशी ‘आॅपरेशन’ सुरू केले.