टाकायचा होता प्लान्ट, विकत घेतला प्लॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:36+5:302021-07-18T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वत:ला कन्सल्टन्ट म्हणवून घेणाऱ्या एका आरोपीने एमबीए झालेल्या एका तरुणाला मिनरल वॉटरचा प्लान्ट टाकण्यासाठी ...

टाकायचा होता प्लान्ट, विकत घेतला प्लॉट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:ला कन्सल्टन्ट म्हणवून घेणाऱ्या एका आरोपीने एमबीए झालेल्या एका तरुणाला मिनरल वॉटरचा प्लान्ट टाकण्यासाठी मशिन विकत घेऊन देतो, असे सांगून ११.५० लाख रुपये हडपले. हनिकुमार राजेंद्रकुमार शर्मा असे रक्कम हडपणाऱ्या आरोपीचे नाव असून शुक्रवारी अंबाझरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
शर्मा हिलटॉप नागपूर येथे राहतो. स्वत:ला कन्सल्टन्ट म्हणवून घेणाऱ्या शर्माचा मशिनरी विक्रीचाही व्यवसाय असल्याचे तो सांगतो. गांधीनगरातील मोहनिश भोजराज कुकडे (वय २८) हे उच्चशिक्षित (एमबीए) असून त्यांना मिनरल वॉटरचा प्लान्ट सुरू करायचा होता. त्यासंबंधाने सल्लामसलत करण्यासाठी कुकडे १६ जानेवारी २०२० ला आरोपी शर्माकडे गेले होते. त्यांनी मिनटरल वॉटरचा प्लान्ट सुरू करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आरोपीने शर्माने त्यांना मशिनरी तसेच अन्य आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. मशिन विकत घेण्याच्या नावाखाली पुढच्या १० दिवसांत कुकडेकडून आरोपी शर्माने ११ लाख, ५० हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतले. मशिन खरेदी न करता आरोपीने परस्पर त्या रकमेतून प्लॉट विकत घेतला. नंतर लॉकडाऊन लागल्याची बतावणी करून टाळाटाळ करू लागला. त्याची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर कुकडे यांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपीने त्यांना दीड वर्षे झुलविले. त्याने फसवणूक केल्याचे आणि तो आपली रक्कम परत करणार नसल्याचे लक्षात आल्याने कुकडेंनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी सुरू आहे.
---