तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची रिफंडसाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:41+5:302021-04-17T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपात आपली यात्रा रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिाटच्या रिफंडसाठी भटकंती करावी ...

तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची रिफंडसाठी भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपात आपली यात्रा रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिाटच्या रिफंडसाठी भटकंती करावी लागत आहे. इतवारी रेल्वे स्टेशनवर तिकीट रद्द करण्यास येणाऱ्या प्रवाशांना रिफंड केले जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असल्याचा आरोप भारतीय यात्री केंद्राचे सचिव व मध्य रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य बसंत कुमार शुक्ला यांनी लावला आहे.
इतवारी स्टेशनवरून रिफंडसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पाठविले जात आहे. कोरोना संक्रमणामुळे गांधीबाग व इतवारी क्षेत्र सील करण्यात आले आहे. शिवाय, इतवारी ते नागपूर स्टेशनचे अंतर सहा किलोमीटर आहे. अशा स्थितीत इतवारी आरक्षण केंद्रावरच रिफंड सुविधा का उपलब्ध केली जात नाही. प्रवाशांना आपले तिकीट रद्द करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शुक्ला यांनी याबाबतची तक्रार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक विकास कश्यप यांच्याकडे केली आहे. सोबतच इतवारी स्टेशनवर अशा प्रकारे अनेकवेळा व्यवहार होत असतो. याचे पुरावेही त्यांच्याजवळ असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. इतवारी रेल्वे स्टेशनवरच तिकीट रिफंड करण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी कश्यप यांच्याकडे केली आहे.