पावसामुळे घराची भिंत काेसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:15+5:302021-09-14T04:12:15+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बेसूर : वेकाेलिच्या काेळसा खाणीतील स्फाेटांच्या हादऱ्यांमुळे आधीच खिळखिळी झालेली मातीचे बांधकाम असलेल्या घराची भिंत मुसळधार ...

The wall of the house collapsed due to rain | पावसामुळे घराची भिंत काेसळली

पावसामुळे घराची भिंत काेसळली

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेसूर : वेकाेलिच्या काेळसा खाणीतील स्फाेटांच्या हादऱ्यांमुळे आधीच खिळखिळी झालेली मातीचे बांधकाम असलेल्या घराची भिंत मुसळधार पाऊस बरसताच काेसळली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना बेसूर (ता. भिवापूर) येथे रविवारी (दि. १२) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

उत्तम नन्नावरे (रा. बेसूर, ता. भिवापूर) हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या घराचे बांधकाम हे माती-दगडांचे आहे. जवळच असलेल्या वेकाेलिच्या गाेकुल खाणीतील काेळसा काढण्यासाठी अधिक क्षमतेचे स्फाेट घडवून आणले जातात. या स्फाेटांमुळे इतरांसह उत्तम नन्नावरे यांचेही घर खिळखिळे झाले आहे.

बेसूर येथे आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे नन्नावरे यांच्या घराच्या भिंतीतही पावसाचे पाणी मुरल्याने माती सैल झाली. त्यातच रविवारी सकाळी त्यांची पत्नी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना घराची भिंत काेसळली. माती पडायला सुरुवात हाेताच तिने घरातून पळ काढल्याने जीवितहानी टळली. नन्नावरे यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्यांना घर बांधण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

...

अन् रेग्युलेटर बंद केले

घराची भिंत काेसळत असताना उत्तम नन्नावरे यांची पत्नी स्वयंपाक करत हाेती. त्यामुळे गॅस व रेग्युलेटर सुरूच हाेते. त्यांनी लगेच तिथून पळ काढला. यावेळी रेग्युलेटर सुरू असल्याने उत्तम नन्नावरे यांच्या लक्षात आल्याने ते धाेका पत्करून त्या खाेली शिरले आणि गॅसचा रेग्युलेटर बंद केला. कोळसा खाणीतील स्फाेटांमुळे बेसूर येथील पक्क्या घरांच्याही भिंतींना तडे गेले आहेत.

Web Title: The wall of the house collapsed due to rain