शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मेट्रोचे ‘चला नागपूर’ अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:52 IST

आपण कधी सापशिडी हा खेळ खेळलात काय? कदाचित लहानपणी तर नक्कीच हा खेळ खेळला असालच. आता हा खेळ परत खेळण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. बालपणीचा खेळ खेळून सर्वांना आनंद होणार आहे. या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागीदेखील घेता येईल. आयोजन महामेट्रो, मनपा आणि शहरी वाहतूक संस्थेच्यावतीने १ नोव्हेंबर ‘चला नागपूर’ या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामेट्रो, जीआयझेड, मनपाचा १ रोजी संयुक्त उपक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण कधी सापशिडी हा खेळ खेळलात काय? कदाचित लहानपणी तर नक्कीच हा खेळ खेळला असालच. आता हा खेळ परत खेळण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. बालपणीचा खेळ खेळून सर्वांना आनंद होणार आहे. या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागीदेखील घेता येईल. आयोजन महामेट्रो, मनपा आणि शहरी वाहतूक संस्थेच्यावतीने १ नोव्हेंबर ‘चला नागपूर’ या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.सापशिडीच नाहीतर यासारखे विविध खेळ खेळले जाणार आहे. यासाठी नागपुरातील विविध ठिकाणे ठरविण्यात आली आहेत. २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान शहरी विकास मंत्रालयातर्फे आयोजित अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्याने ‘पब्लिक आऊट रिच डे’ संकल्पनेंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे आणि जास्तीत ज्यास्त नागरिकांनी सायकलचा वापर करण्याच्या उद्देशाने अनोखी संकल्पना राबविली जात आहे. १ नोव्हेंबरला पहाटे ६ ते सायंकाळी ७ पर्यंत विविध खेळ आणि उपक्रम होणार आहे. वॉकथॉनची सुरुवात जपानी गार्डन, सेमिनरी हिल्स येथील वॉकर्स स्ट्रीट येथे सकाळी ७ पासून होणार आहे. त्याचप्रमाणे वॉकर स्ट्रीट, सिव्हील लाईन्स (रामगिरी रोड) येथे सकाळी ६ ते ९ पर्यंत ग्रीन स्ट्रीट कार्निव्हलमध्ये नागरिकांना नागरी वाहतूक प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे. व्हीएनआयटी गेटसमोर ‘पॉप-अप पार्क’ची संकल्पना राबविली जाणार आहे.समारोप धरमपेठ येथील ट्रॉफिक पार्कमध्ये सायंकाळी ५.३० वाजता होणार असून विजेत्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना सायकलचे महत्त्व पटवून देण्यात येईल, शिवाय नागरिकांना सायकल चालविण्याची शपथ देण्यात येणार आहे. जीआयझेडच्या प्रकल्प व्यवस्थापक सारा हॅबरसॅक यांनी प्रकल्पाची प्रशंसा केली आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर