प्रादुर्भाव वाढल्यानंतर आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:34 IST2017-10-10T00:34:18+5:302017-10-10T00:34:38+5:30
शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे यात भर पडली आहे.

प्रादुर्भाव वाढल्यानंतर आली जाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे यात भर पडली आहे. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग झोपेत आहे. रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, आयुक्त अश्विन मुदगल व अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी आरोग्य विभागा(दवाखाने)ची बैठक आयोजित करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
स्वाईन फ्लूसंदर्भात नागरिकांत जनजागृती करून अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित केली. वास्तविक आरोग्य विभागाने यापूर्वीच उपाययोजना करणे अपेक्षित होते.
आरोग्य विभाग स्वाईन फ्लूच्या मृत्यूची आकडेवारी गोळा करण्यात व्यस्त आहे. मात्र विभागाकडून नागरिकांत जनजागृती केली जात नाही तसेच औषधी उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांना मेडिकल रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. वास्तविक महापालिके च्या रुग्णालयांची ही जबाबदारी आहे. स्वाईन फ्लूसंदर्भात खबरदारी घ्या. सर्दी, ताप, डोकेदुखी, उलटी होत असलेल्या रुग्णांची तपासणी करा, असे निर्देश रवींद्र कुंभारे यांनी दिले.
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी उपाय
स्वाईन फ्लू टाळण्यासाठी स्वच्छ पाण्याने हात धुवा, यासाठी साबण वापरा, सकस आहार घ्या, स्वाईन फ्लू रुग्णांपासून किमान सहा फूट दूर राहा, खोकलताना तोंडावर रुमाल धरा, पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या भाज्या सेवन करा.