५५ लाखांचे प्रतीक्षालय कुलपात

By Admin | Updated: May 21, 2014 00:57 IST2014-05-21T00:57:35+5:302014-05-21T00:57:35+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ५५ लाख रुपये खर्चून स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालयाचे बांधकाम करण्यात आले. जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार

Waiting room for Rs 55 lakh | ५५ लाखांचे प्रतीक्षालय कुलपात

५५ लाखांचे प्रतीक्षालय कुलपात

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ५५ लाख रुपये खर्चून स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालयाचे बांधकाम करण्यात आले. जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पणही झाले. मात्र तेव्हापासून हे प्रतीक्षालय कुलपातच आहे. सफाई कर्मचारी नसल्याने प्रतीक्षालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मेडिकलमध्ये दोन जुने प्रतीक्षालय आहेत. सफाईच्या अभावाने या प्रतीक्षालयात रुग्णांच्या नातेवाईकाने प्रतीक्षा करणे कठीण जाते. यामुळे नातेवाईक व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला बसून असतात. अनेक वेळा नातेवाईकांच्या गर्दीतून रुग्ण, डॉक्टर, परिचारिकांना वाट काढणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून तीन वर्षांपूर्वी आधुनिक प्रतीक्षालयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. निधी मिळताच बांधकामाला सुरुवात झाली. बांधकाम विभागाने मेडिकलला त्याचा ताबा दिला. नव्या वर्षात थाटात लोकार्पणही झाले. परंतु तीन महिने लोटूनही नातेवाईकांना याचा उपयोग नाही. दोन मजल्याचे हे प्रतीक्षालय स्त्री आणि पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीत सहा प्रतीक्षालये आहेत. यात प्रसाधनगृहाची विशेष व्यवस्था करण्यात आली. या प्रतीक्षालयाची साफसफाई कंत्राट पद्धतीवर देणार होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. प्रतीक्षालयाला कुलपात बंद करून अधिकारी मोकळे झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting room for Rs 55 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.