पंतप्रधानांच्या दौऱ्याची प्रशासनाला प्रतीक्षा

By Admin | Updated: August 9, 2014 02:30 IST2014-08-09T02:30:09+5:302014-08-09T02:30:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ आॅगस्टला नागपुरात येणार असल्याची सर्वत्र चर्चा असली तरी...

Waiting for the administration of the PM's tour | पंतप्रधानांच्या दौऱ्याची प्रशासनाला प्रतीक्षा

पंतप्रधानांच्या दौऱ्याची प्रशासनाला प्रतीक्षा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ आॅगस्टला नागपुरात येणार असल्याची सर्वत्र चर्चा असली तरी या दौऱ्यासंदर्भातील एनटीपीसीचे पत्र वगळता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आला नाही. एनटीपीसीच्या पत्रात पंतप्रधान २१ तारखेला मौदा येथील कार्यक्रमाला येऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी नागपूरला येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांचा दौरा कसा असणार याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एनटीपीसीचे पत्र वगळता अद्याप तरी अधिकृत दौरा आला नाही,असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणेला दौऱ्यापूर्वी काही दिवस आधी दिली जाते. हे येथे उल्लेखनीय.
मोदी या दौऱ्यात नागपुरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करतील तसेच वर्धा जिल्ह्यातील देवळीतील पॉवरग्रीडचे उद््घाटन आणि तुळजापूर महामार्गाचे भूमिपूजन करतील, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते. देवळीच्या कार्यक्रमाबाबत वर्धेचे खासदार रामदास तडस यांनीही दुजोरा दिला होता. मात्र असे असले तरी अधिकृत दौऱ्याची माहिती जिल्हा प्रशासन, मेट्रो रेल्वेची नोडल एजन्सी नागपूर सुधार प्रन्यास आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेचा बंदोबस्त करणाऱ्या पोलीस यंत्रणेलाही प्राप्त नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the administration of the PM's tour