व्हीएनआयटीवर संघाची छाया !
By Admin | Updated: November 8, 2014 02:43 IST2014-11-08T02:43:54+5:302014-11-08T02:43:54+5:30
अभियांंत्रिकी शिक्षणासाठी देशात नावाजलेल्या ‘व्हीएनआयटी’चे (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) अध्यक्ष विश्राम जामदार यांच्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

व्हीएनआयटीवर संघाची छाया !
नागपूर : शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या विळख्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. महापौर प्रवीण दटके मात्र मुख्यमंत्र्यांचा सत्कार अन् विधानसभा निवडणुकीतील विजयात मश्गूल आहेत. यातच त्यांना मच्छर कमी झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. मच्छर दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशीच काहिशी त्यांनी भूमिका घेतल्याने महापालिकेलाच डेंग्यूने पछाडल्याचे चित्र आहे.
अॅबिटमुळे डास मरतच नाही
मनपाच्या आरोग्य विभागामार्फ त डास निर्मूलनासाठी अॅबिट औषधीची फवारणी केली जाते. परंतु औषधाचे योग्य प्रमाण वापरले जात नाही. पाण्याचे अधिक प्रमाण असल्याने फवारणीनंतरही डास मरत नाही. हे औषध जाते कुठे, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. पूर्वी बायटेस औषधाची फवारणी केली जायची, परंतु या फवारणीमुळे कर्मचाऱ्यांना बाधा होण्याचा धोका असल्याने अॅबिट औषध वापरले जाते, अशी माहिती मलेरिया विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
डेंग्यू झाला तर काय होते?
साधा ताप आला तरी डेंग्यू तर नाही ना, अशी धास्ती लोकांनी घेतली आहे. डेंग्यूची लागण झाल्यास महापालिका व शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. येथे आवश्यक तपासणी व औषधावरील खर्च एक लाखाच्या आसपास येतो. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने डेंग्यू आजाराची लोकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
पालकांची चिंता वाढली
शाळेत गेलेला आपला पाल्य घरी व्यवस्थित परतेल की नाही अशा चिंतेत पालक आहेत. शाळा परिसरात अस्वच्छता व पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनाही डेंग्यूची लागण झालेली आहे. डेंग्यू नियंत्रण संदर्भात बहुसंख्य संस्था चालकही फारसे गंभीर नाही. मनपाकडूनही त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.
रुग्णांचा डाटा नाही
२५८ नागरिकांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले आहे. आॅक्टोबर महिन्यात ३५५ संशयितांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी १५ रुग्णांना डेंग्यूचे झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक खासगी रुग्णालयाकडून मनपाच्या आरोग्य विभागाला डेंग्यू रुग्णांची माहिती दिली जात नाही. आरोग्य विभागही या संदर्भात गंभीर नसल्याने मनपाच्या आरोग्य विभागाकडे डेंग्यू रुग्णांचा इत्थंभूत डाटा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
मनपाकडून कारवाई नाही
रमेश सिंगारे यांच्या म्हणण्यानुसार सामान्य घरांसोबतच हॉटेल, मंगल कार्यालये, बंद असलेली घरे आणि उघड्या प्लॉट धारकांना सुद्धा डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. आवश्यकता पडल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस पाणी जमा करण्यात येऊ नये, असे निर्देश नागरिकांना देण्यात आले आहेत. परंतु अनेक वस्त्यात उघड्यावर कचरा व घाण करण्याचे प्रकार माहीत असूनही आरोग्य विभागाकडून कोणन्याही स्वरूपाची कार्यवाही केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
२५८ जणांना डेंग्यूचा डंख
शहरात डेंग्यू पॉझिटिव्हची संख्या २५८ वर गेली असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्यावतीने ३ लाख ७० हजार घरांची झाडाझडती घेतली असून यात ११ हजार घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
२० शाळांमध्ये आढळल्या होत्या डेंग्यूच्या अळ्या
महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या शाळा तपासणीमध्ये तब्बल २० वर शाळांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या होत्या. शाळांमध्ये डेंग्यूची उत्पत्ती ही बंद कूलर्स आणि उघड्या पाण्याच्या टाकीतून होत असल्याचे निदर्शनास आले होते. डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली असताना शाळा प्रशासन या विषयी गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. लोकमतच्या चमूने १ सप्टेंबर रोजी शहरातील दहा शाळांचे निरीक्षण केले. यातील बहुसंख्य शाळांमध्ये पाण्याचे डबके, उघडे टाके, बंद कूलर्स हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण ठरत असल्याचे ‘डेंग्यूचे विघ्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने खासगीसह मनपाच्या शाळा तपासणीची मोहीम हाती घेतली. सुमारे २६० शाळांची तपासणी करण्यात आली. यात २० शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. डेंग्यूचे डास दिवसा चावतात आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहतात. यामुळे महापालिका प्रशासनाने याला गंभीरतेने घेतले होते. परंतु दरम्यानच्या काळात शाळा तपासणीची मोहीम थंडबस्त्यात पडली. यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अधिकाऱ्यांचा असहकार
झोन स्तरावर डेंग्यू नियंत्रणासाठी चमू गठित करण्यात आली आहे. परंतु काही अधिकाऱ्यांनी असहकाराची भूमिका घेतली आहे. लकडगंज झोनमधील एका महिला डॉक्टर समितीत असूनही तिने काम करण्यास नकार दिला आहे. या संदर्भात तिला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. पण पुढे काय, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.