शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘हार्वर्ड’मध्ये ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:18 IST

साधारणत: भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जागतिक पातळीवर मागे पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी हा समज खोडून काढत चक्क जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापीठात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. ‘हार्वर्ड’तर्फे आयोजित ‘ग्लोबल हॅकेथॉन’ स्पर्धेत या चमूने जगभरातून तिसरा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे अशी कामगिरी बजाविणारी ही एकमेव भारतीय चमू ठरली आहे.

ठळक मुद्दे‘हॅकेथॉन’मध्ये पटकाविला तिसरा क्रमांक : जगभरातील विद्यार्थ्यांना केले अचंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जागतिक पातळीवर मागे पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी हा समज खोडून काढत चक्क जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापीठात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. ‘हार्वर्ड’तर्फे आयोजित ‘ग्लोबल हॅकेथॉन’ स्पर्धेत या चमूने जगभरातून तिसरा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे अशी कामगिरी बजाविणारी ही एकमेव भारतीय चमू ठरली आहे.‘हार्वर्ड’ विद्यापीठातर्फे जगभरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल हॅकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यात पर्यावरण या गटात ‘व्हीएनआयटी’च्या बीटेक ‘केमिकल इंजिनिअरींग’च्या विद्यार्थ्यांची चमू सहभागी झाली होती. यात विष्णू मामिडी, उत्कर्ष गुप्ता आणि सुमित साबू यांचा समावेश होता. या चमूने हॉटेल्स व मेसमधील अन्नाची नासाडी व वाया जाणारे प्रमाण कमी करणे तसेच जागृतीसंदर्भात ‘सोल्युशन’ मांडले. जेवण टेबलावर येईपर्यंत एकूण प्रक्रियेत किती पाणी वापरण्यात आले आहे, याची माहितीदेखील माध्यमातून उपलब्ध होण्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी ‘व्हिस्टा’ या ‘वेब पोर्टल’च्या माध्यमातून ‘सोल्युशन्स’ मांडले. या माध्यमातून ग्राहकांना जेवणाचे वाया जाणारे प्रमाण समजणार आहे. सोबतच संबंधित रेस्टॉरेन्टलादेखील याची आपसूकच माहिती मिळणार आहे. यामुळे जनजागृती होईल व अन्नाची नासाडी थांबेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. डॉ.सचिन मांडवगणे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर