राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी ‘व्हीएनआयटी’त युद्धस्तरावर तयारी
By Admin | Updated: September 10, 2015 03:48 IST2015-09-10T03:48:15+5:302015-09-10T03:48:15+5:30
१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी ‘व्हीएनआयटी’त युद्धस्तरावर तयारी
सुरक्षेवर विशेष भर : निवडक विद्यार्थ्यांचाच राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार
नागपूर : १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभाची ‘व्हीएनआयटी’मध्ये युद्धस्तरावर तयारी सुरू असून सुरक्षेच्या मुद्यावरदेखील भर देण्यात येत आहे.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘व्हीएनआयटी’च्या सभागृहात दीक्षांत समारंभ सुरू होणार आहे. या सभागृहासह संपूर्ण परिसरात रंगरंगोटी सुरू आहे.
कार्यक्रमाला अजून अवधी असला तरी संस्थेतर्फे सुरक्षेवर आतापासूनच भर देण्यात येत आहे. ‘व्हीएनआयटी’च्या आत ओळख पटवल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. शिवाय दीक्षांत समारंभात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचेदेखील विशेष ‘पास’ तयार करण्यात येत आहेत. या ‘पास’शिवाय त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)