विवेका हॉस्पिटलचे ‘गुड समेरिटन-सेव्ह अ लाईफ’अभियान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST2021-01-22T04:08:45+5:302021-01-22T04:08:45+5:30

पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अभिनव उपक्रम नागपूर : पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्लॉट नं. १ ए, नाईक ले-आऊट, परसोडी, सुभाषनगर येथील ...

Viveka Hospital's 'Good Samaritan-Save a Life' Campaign () | विवेका हॉस्पिटलचे ‘गुड समेरिटन-सेव्ह अ लाईफ’अभियान ()

विवेका हॉस्पिटलचे ‘गुड समेरिटन-सेव्ह अ लाईफ’अभियान ()

पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अभिनव उपक्रम

नागपूर : पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्लॉट नं. १ ए, नाईक ले-आऊट, परसोडी, सुभाषनगर येथील विवेका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रा.लि.मध्ये ‘गुड समेरिटन-सेव्ह अ लाईफ’ अभियान सुरू करण्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता आणणे आणि याबाबत प्रशिक्षण देण्यासोबतच रुग्णांना वेळीच रुग्णालयात पोहोचविणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे मोफत फ्री प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आणि वेबसाईटवर त्यांचे कार्य अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. के. जी. जयप्रसन्ना, डॉ. प्रशांत जगताप, डॉ. मुकुंद ठाकूर, डॉ. अजय कुर्वे, डॉ. अजय साखरे, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. ध्रुव बत्रा, डॉ. नितीन बाळंखे, डॉ. दीपक मुथरेजा, डॉ. अनुराधा जगताप, डॉ. संजय कोलते, डॉ. स्वप्निल भरंभे, डॉ. अभय चौधरी, प्रमोटर डायरेक्टर्स ए. एस. अय्यर, सतीश लाडे उपस्थित होते. या डॉक्टरांनी सांगितले की, २६ जानेवारी २०२१ रोजी उद्घाटन होणाऱ्या १०० बेडच्या रुग्णालयात न्यूरो, कार्डिओ, रेस्पीरेटरी, लिव्हर, किडनी, ऑर्थोपेडिक, स्कीनबाबत सेवा उपलब्ध आहेत. येथे किडनी ट्रान्सप्लान्ट होते. लवकरच हार्ट, लंग आणि लिव्हर ट्रान्सप्लान्टही होईल. येथे ५ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ३ मॉडर्न आयसीयू, २४ बाय ७ स्पेशालिस्ट डॉक्टर्स, डेडिकेटेड ट्रॉमा सेंटरची सुविधा उपलब्ध आहे. कोविड केअर सेंटर असलेल्या या हॉस्पिटलमधून कोविडचे ६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. क्लिनिकल एक्सलन्स, बेस्ट क्वाॅलिटी आणि इथिकल वर्क हेच हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे.

............

Web Title: Viveka Hospital's 'Good Samaritan-Save a Life' Campaign ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.