शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टाटा समूहाची मेट्रो रेल्वे प्रकल्पाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:00 IST

५ डी बीम मॉडेल तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये वेळ आणि खर्चाची बचत होत असून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरल्याचे उद्गार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी टाटा सन्स, टाटा रिअल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (टीआरआयएल) उच्च-ऊर्जा प्रतिनिधी मंडळासमोर काढले.

ठळक मुद्दे५ डी बीम तंत्रज्ञानाचे सादरीकरणउपयोगितेबाबत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ५ डी बीम मॉडेल तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये वेळ आणि खर्चाची बचत होत असून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरल्याचे उद्गार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो हाऊस येथे टाटा सन्स, टाटा रिअल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (टीआरआयएल) उच्च-ऊर्जा प्रतिनिधी मंडळासमोर काढले.बैठकीची सुरुवात ५डी बीम तंत्रज्ञानाच्या विस्तृत सादरीकरण सोबत झाली आणि ५डी बीमचे महत्त्व व तंत्रज्ञान प्रतिनिधी मंडळाला अवगत करण्यात आले. तसेच नागपूर व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात आली.टाटा ग्रुपच्या प्रतिनिधींना महामेट्रो द्वारे ५डी बीम आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होत असलेल्या अंमलबजावणीची माहिती देण्यात आली. तसेच प्रतिनिधी मंडळाने उद्योग भवन येथे कार्यरत महामेट्रोच्या ५डी बीम वॉर रूमला भेट दिली व त्याठिकाणी ५डी बीमचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) सिस्टीमचा अनुभव घेण्यासाठी साऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर त्यांनी भेट दिली.टाटा ग्रुप प्रतिनिधींनी महामेट्रोद्वारे नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान इतर अनेक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. मुख्य म्हणजे टाटा सन्स महामेट्रोसोबत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एका मार्गिकेच्या निर्माण कार्यामध्ये कार्यरत आहे.बैठकीत महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक आणि सिस्टीम) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक (टेलिकॉम) विनोद अग्रवाल, महाव्यवस्थापक(प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (आयटी आणि इलेक्ट्रिकल) नीलम चंद्र आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच टाटा समूहातर्फे आरती सुब्रमण्यम, मुख्य डिजिटल अधिकारी तानिया रॉय चौधरी उपमहाव्यवस्थापक (इन्फ्रास्ट्रक्चर), एरोस्पेस आणि डिफेन्स (टाटा सन्स) आलोक कपूर, उपाध्यक्ष (अर्बन ट्रान्सपोर्ट) आर. के. भटनागर, सल्लागार अतुल आंबेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रो