शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे ‘व्हीजन डाक्युमेंट’ : चैनसुख संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:54 PM

मागासलेल्या विदर्भात रोजगाराच्या संधी तयार करून, शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याच्या उद्देशाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्यास विदर्भ विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. सर्व ११ ही जिल्ह्याचे डॉक्युमेंट तयार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी दिली.

ठळक मुद्देविदर्भ वैधानिक विकास मंडळाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागासलेल्या विदर्भात रोजगाराच्या संधी तयार करून, शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याच्या उद्देशाने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्यास विदर्भ विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. सर्व ११ ही जिल्ह्याचे डॉक्युमेंट तयार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी दिली.मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आ. संचेती यांनी सांगितले की, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्याचे डॉक्युमेंट तयार आहे. वाशीम आणि गोंदिया जिल्ह्याचे डॉक्युमेंट गुरुवारी सादर झाले. इतर जिल्ह्यातील डॉक्युमेंटचे काम सुरू होईल. तत्पूर्वी मंडळाच्या २०१९-२० च्या दुसऱ्या बैठकीत त्यांनी सांगितले की, मंडळ विदर्भातील समस्यांचा अभ्यास करून विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे काम करेल. या बैठकीला अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव तथा सहसंचालक प्रकाश डायरे, विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. किशोर मोघे, डॉ. कपिल चांद्र्रायण, यशदा, पुणे येथील मानव विकास केंद्राच्या संचालिका डॉ. मीनल नरवणे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे, प्रशासकीय अधिकारी ईश्वर निवांत, गोंदियातील सारडा संस्थेचे पंकज देवकर, अमरावती येथील वूमेन्स स्टडी सेंटरच्या संचालिका डॉ. वैशाली गुडधे, वऱ्हाड संस्थेचे धनानंद नागदिवे आदी उपस्थित होते.विदर्भ विकास मंडळाच्यावतीने मागील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हा विकास अहवालात बदल करुन नवीन प्रारुपाचे सादरीकरण करण्याबाबत अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी सदस्यांना सुचना केल्यातयावेळी वाशीम जिल्हा विकास अहवाल व गोंदिया जिल्हा विकास अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. ‘गाव तेथे गोदाम’ हा समितीचे तज्ज्ञ डॉ. किशोर मोघे यांचा सुधारित प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वूमेन्स स्टडीज सेंटरच्यावतीने सादर केलेल्या ‘विदर्भातील कुमारी मातांच्या समस्यांच्या अध्ययन अहवाल’ प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये कुमारी मातांवर झालेला सामाजिक व आर्थिक परिणाम यावर अभ्यास करून त्यानुसार सुधारित प्रस्ताव विदर्भ विकास मंडळाला सादर करण्यात यावा, अशी सूचना यावेळी अध्यक्ष संचेती यांनी केली.अमरावती येथील वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवींद्र्र वैद्य तसेच कोषाध्यक्ष धनानंद नागदिवे यांनी तुरुंगातील कैद्यांचे जीवनमान, त्यांचे प्रश्न, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अर्थार्जनाच्या समस्या या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पुढील प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्यपाल चे. विद्यासागर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. पेसा (वनहक्क कायद्याची अंमलबजावणी) याबाबत विदर्भ विकास मंडळामार्फत घ्यावयाच्या अभ्यासाचे विषय व कार्यपध्दतीबाबत तज्ज्ञ डॉ. किशोर मोघे यांनी प्रस्ताव सादर केला. आदिवासी क्षेत्रात वनआधारित रोजगार निर्मिती, वनउपजावर प्रक्रिया उद्योग निर्मिती याबाबत जाणीव जागृती या अभ्यास अहवाल प्रकाशनाबाबत चर्चा करण्यात आली. वन्यप्राणी तसेच पक्ष्यांमुळे देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी यावर आधारित अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व विदर्भ विकास मंडळ नागपूर यांच्यामध्ये करार (एमओयू) करण्याबाबतचा मसुदा बैठकीत सादर केला. हा मसुदा तत्त्वत: मान्य करण्यात आला असून पुढील बैठकीमध्ये हा विषय अंतिम करण्यात येईल.केळकर समितीवर मौनपत्रकारांनी विदर्भ विकासाबाबत गठित केळकर समितीच्या अहवालाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर अध्यक्ष आ. संचेती यांनी तो रिपोर्ट मंजूर झाला नसल्याचे स्पष्ट केले. परंतु विदर्भाच्या विकसासाठी खूप काही होत आहे. जळगाव जामोद येथील खारपाण पट्ट्यातही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केली जात आहे. कपिल चांद्रायण यांनी सांगितले की, मंडळ डेव्हलपिंग ग्रोथ स्ट्रेटजीवर काम करीत आहे. याचा उद्देश शिक्षण, आरोग्य, सुशासन आदी आठ सेक्टरचा विकास करणे होय.

 

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळChainsukh Sanchetiचैनसुख संचेती