विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांची दीक्षाभूमीला भेट

By आनंद डेकाटे | Published: September 2, 2023 06:16 PM2023-09-02T18:16:52+5:302023-09-02T18:19:02+5:30

विश्व हिंदू परिषदेच्या समरसता विभागाची अखिल भारतीय बैठक नागपुरात सुरू होत आहे

Vishwa Hindu Parishad International Working President Alok Kumar's visit to Deekshabhumi | विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांची दीक्षाभूमीला भेट

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांची दीक्षाभूमीला भेट

googlenewsNext

नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी शनिवारी दीक्षाभूमीला भेट दिली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक समरसता विभागाचे देवजीभाई रावत, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, प्राचार्या भुवनेश्वरी मेहेर प्रामुख्याने उपस्थित होते.

विश्व हिंदू परिषदेच्या समरसता विभागाची अखिल भारतीय बैठक नागपुरात सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर बैठकीच्या पूर्वसंध्येला आलोक कुमार आणि सर्व क्षेत्रांचे सामाजिक समरसता अभियान प्रमुख यांनी दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. परिसरात बोधीवृक्षाचे दर्शन केले.

दीक्षाभूमी येथील प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद तभाने, विदर्भ प्रांत समरसता प्रमुख संजय चौधरी, विदर्भ प्रांत प्रचार व प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार, पुष्कर लाभे, आनंद मिश्रा, अविनाश इलमे, सुनील सोनडबले, पुरुषोत्तम डडमल उपस्थित होते.

Web Title: Vishwa Hindu Parishad International Working President Alok Kumar's visit to Deekshabhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.