विशाखा मैंद यांचे अपघाती निधन

By Admin | Updated: May 6, 2017 02:21 IST2017-05-06T02:21:20+5:302017-05-06T02:21:20+5:30

माजी नगरसेविका विशाखा बाबा मैंद (वय ५०) यांचे मध्य प्रदेशातील सौंसरजवळ अपघाती निधन झाले.

Vishakha Mind's accidental demise | विशाखा मैंद यांचे अपघाती निधन

विशाखा मैंद यांचे अपघाती निधन

सौंसरजवळ कारचा टायर फुटला : मुलासह सहा जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी नगरसेविका विशाखा बाबा मैंद (वय ५०) यांचे मध्य प्रदेशातील सौंसरजवळ अपघाती निधन झाले. शुक्रवारी सकाळी ५.४० च्या सुमारास त्यांच्या इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला. त्यात विशाखा यांचा मुलगा आणि अन्य सहा जण जबर जखमी झाले.
मैंद यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमपेठ झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या विशाखा मैंद यांच्या भावाचे अडीच महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी विशाखा त्यांच्या नातेवाईकांसह तीन दिवसांपूर्वी अलाहाबाद, काशी येथे गेल्या होत्या. धार्मिक विधी आटोपून शुक्रवारी सकाळी त्या नागपूरकडे परत येत असताना सौंसरच्या पुलाजवळ वाहनचालकाला झोप अनावर झाली. त्यामुळे भरधाव इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला असलेल्या टोकदार दगडावर चढल्याने कारचा टायर फुटला. परिणामी भीषण अपघात होऊन कारमधील विशाखा यांच्यासह त्यांचा मुलगा शर्विल (वय १३), आई सुनंदा शेंडे (वय ७०) तसेच प्रीती शेंडे (वय ४२), भाची अदिती ताह्मण (वय २७)संजय वरखेडे आणि महेश परमार असे सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले. हा अपघात घडला त्यावेळी सौंसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी खान तसेच मेडिकल स्टोर्सचे संचालक मानेकर तेथून जात होते. अपघात पाहून त्यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्या इस्पितळात नेले असता विशाखा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मैंद यांना अपघाताची माहिती देऊन सर्व जखमींना गंभीर अवस्थेत नागपुरात उपचारासाठी आणण्यात आले. भल्या सकाळी या अपघाताचे वृत्त नागपुरात पोहचले. त्यानंतर मैंद यांच्या आप्तस्वकियांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली. सायंकाळी अंबाझरी घाटावर विशाखा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: Vishakha Mind's accidental demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.