वर्चुअली पंचामृत अभिषेक मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:08 IST2021-05-08T04:08:17+5:302021-05-08T04:08:17+5:30

श्री. दिगंबर जैन सेनगण मंदिराचे अध्यक्ष सतीश जैन, सचिव उदय जोहरापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात सारस्वताचार्य देवनंदीजी गुरुदेव, ...

Virtually Panchamrut Abhishek Tuesday | वर्चुअली पंचामृत अभिषेक मंगळवारी

वर्चुअली पंचामृत अभिषेक मंगळवारी

श्री. दिगंबर जैन सेनगण मंदिराचे अध्यक्ष सतीश जैन, सचिव उदय जोहरापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात सारस्वताचार्य देवनंदीजी गुरुदेव, आचार्यश्री गुप्तिनंदीजी गुरुदेव यांच्यासह अनेक साधुसंतांचे सान्निध्य प्राप्त होणार आहे. राष्ट्रसंत युवाचार्य गुणधरनंदीजी गुरुदेवांच्या सान्निध्यात व मार्गदर्शनात कार्यक्रम होईल. मंगळवारी ११ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून कार्यक्रमाचे प्रसारण पारस व जिनवाणी चॅनलवर होईल. झूमच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. दीप प्रज्वलन रिजनल ऑफिस अमरावतीचे डेप्युटी डायरेक्टर सुशील आग्रेकर, जिल्हा सांख्यिकी व नियोजन अधिकारी ठाणे अमोल खंडारे, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे माजी राष्ट्रीय सचिव संतोष जैन, सुंदरलाल सावजी को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मुकुंदसावजी कळमकर, णमोकार तीर्थ ट्रस्टचे अध्यक्ष नीलम अजमेरा करतील. कार्यक्रमाचे संयोजक सुनील जैन पेंढारी, परिमल खेडकर, सतीश जैन पेंढारी हे आहेत.

Web Title: Virtually Panchamrut Abhishek Tuesday