तुली परिवारातील ‘भाऊबंदकी’ विकोपाला

By Admin | Updated: October 26, 2016 03:02 IST2016-10-26T03:02:17+5:302016-10-26T03:02:17+5:30

शहरातील परिचित व्यावसायिक वीरेंद्रपालसिंग दर्शनसिंग तुली यांच्या परिवारातील वाद विकोपाला गेला आहे

Vipopala's 'brother-in-law' in Tule family | तुली परिवारातील ‘भाऊबंदकी’ विकोपाला

तुली परिवारातील ‘भाऊबंदकी’ विकोपाला

वीरेंद्रसिंगांची भाऊ आणि मुलाविरुद्ध तक्रार :
फसवणुकीचा गुन्हा दाखल

नागपूर : शहरातील परिचित व्यावसायिक वीरेंद्रपालसिंग दर्शनसिंग तुली यांच्या परिवारातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांनी स्वत:चे दोन लहान भाऊ आणि मुलाविरुद्ध बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे तयार करण्याचा आणि त्या आधारे मालमत्ता हडपण्याची तक्रार केली आहे. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
६९ वर्षीय वीरेंद्रपालसिंग तुली इंदोरा चौकाजवळच्या कश्मिरी गल्लीत राहतात. त्यांनी सदर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, १ फेब्रुवारी २००५ ला त्यांचे लहान बंधू महेंद्रपालसिंग दर्शनसिंग तुली (वय ६५) आणि परमजितसिंग तसेच मुलगा नवनीतसिंग तुली यांनी वीरेंद्रपालसिंग यांच्या खोट्या सह्या मारून बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे दर्शन टॉवरची कोट्यवधींची मालमत्ता उपरोक्त आरोपींनी आपल्या नावावर करून घेतली. ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर वीरेंद्रपालसिंग यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रारंभी कौटुंबिक प्रकरण असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणात अनेक मंडळींनी स्वारस्य दाखवून प्रकरण रेटून धरले. त्यामुळे प्रदीर्घ चौकशीनंतर आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खजे यांनी गुन्हा दाखल केला. तूर्त कुणालाही अटक झाली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Vipopala's 'brother-in-law' in Tule family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.