लाचखोरांविरुद्ध वज्राघात

By Admin | Updated: March 11, 2015 02:14 IST2015-03-11T02:14:33+5:302015-03-11T02:14:33+5:30

पोलीस सेवेतील पदार्पणाच्या प्रारंभीच दहा लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या परीविक्षाधीन फौजदाराने राज्याच्या अख्ख्या पोलीस दलाला हादरा दिला आहे.

Violence Against Bribes | लाचखोरांविरुद्ध वज्राघात

लाचखोरांविरुद्ध वज्राघात

नागपूर : पोलीस सेवेतील पदार्पणाच्या प्रारंभीच दहा लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या परीविक्षाधीन फौजदाराने राज्याच्या अख्ख्या पोलीस दलाला हादरा दिला आहे. या रकमेपैकी त्याने आधी तीन लाख घेतले. लाचेचा दुसरा हप्ता पाच लाख घेत असताना तो अलगद एसीबीच्या जाळ्यात अडकला. अन्य एका कारवाईत सीबीआयने एका वैज्ञानिकाला १५ हजाराची लाच घेताना पकडले. तो जेएमएफसी न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपिलात जाण्याची धमकी देऊन ‘अ‍ॅक्वा वॉटर’च्या उद्योजकाकडून ही लाच घेत होता. या दोन्ही लाचखोरांविरुद्धच्या वज्राघातामुळे लाचखोरी करणारे तूर्त हादरले आहेत.

पोलीस उपनिरीक्षकाकडून
१० लाखाच्या लाचेची मागणी


नागपूर : रुग्णालय अवैध असल्याचे सांगून डॉक्टराकडून १० लाख रुपयाच्या लाचेची मागणी राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण राजाराम घोडाम याने केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून ५ लाख रुपयांची लाच घेताना, उपनिरीक्षकाचा सहकारी सुरज ऊर्फ सूर्यकांत गजानन लोलगे (२९) याला रंगेहाथ अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक फरार झाला. सूरजवर यापूर्वीही प्रतापनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक प्रवीण घोडाम याची २०१३ मध्ये राणाप्रतापनगर ठाण्यात नेमणूक झाली होती. त्याने पोलीस स्टेशन हद्दीतील एका डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन, रुग्णालयाचे मोबाईलमध्ये फोटो घेऊन, अवैधरीत्या रुग्णालय चालवून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची धमकी डॉक्टरला दिली.

Web Title: Violence Against Bribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.