कोविड नियमाचे उल्लंघन :  आर.डी. डिस्ट्रिब्युटर्सला २५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 20:40 IST2021-03-24T20:38:13+5:302021-03-24T20:40:42+5:30

Violation of Covid rules कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धंतोली झोनमधील टिंबर मार्केट येथील आर.डी. डिस्ट्रिब्युटर्सला बुधवारी २५ हजाराचा दंड करण्यात आला.

Violation of Covid rules: R.D. Distributors fined Rs 25,000 | कोविड नियमाचे उल्लंघन :  आर.डी. डिस्ट्रिब्युटर्सला २५ हजाराचा दंड

कोविड नियमाचे उल्लंघन :  आर.डी. डिस्ट्रिब्युटर्सला २५ हजाराचा दंड

ठळक मुद्दे१४ प्रतिष्ठानांना १.१० लाखाचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धंतोली झोनमधील टिंबर मार्केट येथील आर.डी. डिस्ट्रिब्युटर्सला बुधवारी २५ हजाराचा दंड करण्यात आला. धंतोली झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठांनाची तपासणी करून ३५ हजार दंड वसूल केला. एनडीएसच्या पथकांनी ४९ प्रतिष्ठान, कार्यालयांची तपासणी केली. १४ जणांवर कारवाई करून १ लाख १० हजाराचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने एका प्रतिष्ठानाची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोनच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी केली. नेहरूनगर झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार तर गांधीबाग झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार तर आशीनगर झोनच्या पथकाने पाच हजार रुपये दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या पथकाने १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Violation of Covid rules: R.D. Distributors fined Rs 25,000