विनोद रापतवार नागपुरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी, टाकेंची नांदेडला बदली

By योगेश पांडे | Updated: February 1, 2024 23:26 IST2024-02-01T23:26:27+5:302024-02-01T23:26:42+5:30

नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे.

Vinod Rapatwar is the new District Information Officer of Nagpur, transfer of tanks to Nanded | विनोद रापतवार नागपुरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी, टाकेंची नांदेडला बदली

विनोद रापतवार नागपुरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी, टाकेंची नांदेडला बदली

योगेश पांडे 

नागपूर : नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली आहे. गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झाली असेल त्याची यादी शासनाने मागविली होती. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. टाके यांच्यासोबतच वर्धाचे जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांची यवतमाळला, लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची जळगावला, नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे तर सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी संपदा बिडकर यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे. नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची नागपुरला बदली झाली आहे. लवकरच ते कार्यभार स्वीकारतील. टाके हे २० ऑगस्ट २०२० रोजी नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले होते.

Web Title: Vinod Rapatwar is the new District Information Officer of Nagpur, transfer of tanks to Nanded