विजयरत्नसुंदर सुरिश्वरजी यांची प्रकृती उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:16+5:302021-02-06T04:15:16+5:30
नागपूर : पद्मभूषण जैन आचार्य श्री विजयरत्नसुंदर सुरिश्वरजी म.सा. यांची प्रकृती उत्तम आहे. मुंबई येथील ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये महाराजांच्या ...

विजयरत्नसुंदर सुरिश्वरजी यांची प्रकृती उत्तम
नागपूर : पद्मभूषण जैन आचार्य श्री विजयरत्नसुंदर सुरिश्वरजी म.सा. यांची प्रकृती उत्तम आहे. मुंबई येथील ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये महाराजांच्या गुडघ्यांवर काही दिवसांपूर्वीच यशस्वी सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी देशातील विख्यात सर्जन डॉ. संजय अग्रवाल यांनी केली. आज शुक्रवारी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकमत मिडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी आचार्य श्री विजयरत्नसुंदर सुरिश्वरजी म.सा. यांचे दर्शन घेतले. ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या दर्डा यांनी डॉक्टरांशी चर्चा करून महाराजांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये साध्वी श्री संवेदनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या. महाराजांच्या दर्शनार्थ पोहोचलेल्या दर्डा यांच्यासेाबत प्रख्यात डॉ. राजीव शर्मा, डॉ. प्रति समदानी व राजू शहा ब्रिज कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.
फोटो ओळी - मुंबई येथील ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये पद्मभूषण जैन आचार्य श्री विजयरत्नसुंदर सुरिश्वरजी म.सा. यांच्या प्रकृतीची चौकशी करताना सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा.