शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

By योगेश पांडे | Updated: September 28, 2025 23:56 IST

संस्कार-शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे बीज, बाल स्वयंसेवकांचे उर्जावान संचलन

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: कोवळ्या वयातील पावलांना अनुशासनाची जोड, निरागस डोळ्यांत चमकणारे राष्ट्रप्रेम, आणि शिस्तबद्ध संचलनात दिसलेली संस्कारांची झलक...अशा अद्वितीय संगमाचा नागपुरकरांना रविवारी सायंकाळी अनुभव मिळाला. संस्कारांतून नागरिक, नागरिकांतून राष्ट्र असे विचारअमृत घेणाऱ्या या लहान स्वयंसेवकांना पाहून नागरिकदेखील त्याच उर्जेने प्रतिसाद देताना दिसले. रविवारी शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्याचे आयोजन शहरातील आठ विविध मैदानांवर करण्यात आले होते. सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध यांचा प्रामुख्याने समावेश होता. शिशु स्वयंसेवकांनी कृष्णयोग, श्रीराम योग, विठ्ठल योग व हनुमान योगाची प्रात्यक्षिके सादर केली. शेवटी घोषाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रात्यक्षिक झाले.कार्यक्रमाअगोदर सर्वच ठिकाणी बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील संघ पदाधिकारी व जेष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला.

वक्त्यांचा सूर, संघाची शाखा हे व्यक्ती निर्माणाचे केंद्र

विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत वक्त्यांनी संघाची शाखा हे व्यक्तीनिर्माणाचे केंद्र असल्याची भावना व्यक्त केली. सोमलवाडा भागातील उत्सव सुरेंद्रनगर येथील नासा मैदानावर झाला. उद्योजक शशिकांत मानापुरे व संघाचे महानगर महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख प्रसन्न महानकर तसेच भाग संघचालक श्रीकांत चितळे उपस्थित होते. मोहिते भागातील बाल स्वयंसेवकांचा उत्सव बगडगंज स्थित गरोबा मैदान येथे आयोजित करण्यात आला. कच्छ पाटीदार समाजाचे महामंत्री शांतीलाल पटेल, विदर्भ प्रांत बाल कार्य प्रमुख अश्विन जयपुरकर, संघचालक रमेश पसारी यावेळी उपस्थित होते. नंदनवन भागाचा उत्सव डॉ.हेडगेवार स्मारक समितीच्या यादव भवनात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठाचे संचालक डॉ. रवीशंकर मोर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. सचिन कठाळे, नागपूर महानगर संघचालक श्री राजेश लोया आणि नंदनवन भाग संघचालक अशोक बुजोने यांची उपस्थिती होती. तेथे सांघिक गीत, संस्कृत सुभाषित, अमृतवचन आणि वैयक्तिक गीत या बौद्धिक विषयांचे सादरीकरण बाल स्वयंसेवकांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : RSS's children's Vijayadashami festival celebrated with enthusiasm in Nagpur.

Web Summary : Nagpur witnessed RSS's children's Vijayadashami celebrations across various locations. Young volunteers showcased drills, yoga, and physical exercises, emphasizing discipline and patriotism. Speakers highlighted the RSS branch's role in character building. The event saw enthusiastic participation from volunteers, citizens, and senior RSS members.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ