शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीचा सजग प्रहरी काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:36 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ठळक मुद्देज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. १६ जुलैपासून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नागपुरातील सामाजिक चळवळींना आधार देणारा, त्यांचे पालकत्व स्वीकारणारा आणि प्रसंगी कुठलीही किंमत चुकविण्याची तयारी ठेवणारा निरपेक्ष सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. उमेशबाबूंच्या निधनाने केवळ नागपुरातीलच नाही तर विदर्भातील सामाजिक चळवळी आणि कार्यकर्त्यांना दीर्घकाळपर्यंत पोरकेपणा जाणवणार आहे.उमेशबाबू यांचा जन्म १७ एप्रिल १९३३ रोजी हरदा मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे मूळ गाव होलीपुरा त. बह, जि. आग्रा उत्तर प्रदेश होते. नागपुरातून त्यांनी शिक्षण घेतले आणि येथेच स्थायिक झाले. उमेशबाबू हे नागपूरचे सजग प्रहरी म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासूनच ते आंदोलनात सक्रिय झाले. पुढे पत्रकार म्हणून त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली. पत्रकार असतानाच ते कामगारांच्या चळवळीत सामील झाले. त्यांचा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग होता. समाजात कुणावरही, कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर सर्वात अगोदर आवाज उचलणारे व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे होते. बाबूजी म्हणून लोक त्यांना ओळखायचे. पुढे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. अनेक भोंदूबाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. सामाजिक कार्यासोबतच पत्रकारिता, नाट्य, साहित्य अशा विविध क्षेत्रात ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्याच्या शेवटपर्यंत लढणारे ते खऱ्या अर्थाने एक सजग प्रहरी होते.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर