शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीने तापवले वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:12 IST

निवडणुकीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या  अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली.

ठळक मुद्देएनएसयुआय व राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेने टाकला बहिष्कार : पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनांचा चांगलाच कलगीतुरा बघायला मिळाला. एनएसयुआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेने बहिष्कार टाकत निवडणुकीच्या वेळी विद्यापीठाच्या बाहेर शिक्षण मंत्री व कुलगुरुंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या  अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली.काही दिवसांपूर्वी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुका पार पडल्या. याच प्रतिनिधींमधून आठ जणांची निवड त्यांच्या महाविद्यालयांच्या स्थापनेच्या कालावधीनुसार, तर सात प्रतिनिधींची निवड कुलगुरुंनी केली. यामध्ये तीन प्रतिनिधी नागपूर शहर, दोन नागपूर ग्रामीण, दोन वर्धा, भंडारा आणि एका प्रतिनिधीची गोंदिया जिल्ह्यातून निवड करण्यात आली. शैक्षणिक सत्र समाप्तीकडे असताना निवडून येणाऱ्या  अध्यक्ष आणि सचिवाकडे केवळ एक महिन्याचाच कार्यकाळ असेल. मात्र, त्यांना व्यवस्थापन परिषदेमध्ये मताधिकार असल्याने त्यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे सर्वच संघटना विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी प्रयत्नरत होत्या. परंतु, विद्यापीठाने प्रतिनिधींची निवड करताना नियमांना डावलून अभाविपला झुकते माप दिल्याचा आरोप एनएसयुआय आणि राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यासंदर्भात संघटनांनी कुलगुरुंची भेट घेत निवडणुका नियम डावलून होत असल्याचा आरोपही केला होता. शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले. ऐन निवडणुकांच्या वेळी एनएसयुआयने जोरदार घोषणाबाजी करीत शिक्षण मंत्री विनोद तावडे व कुलगुरू यांचा निषेध नोंदविला. तसेच अभाविपला झुकते माप देण्यासाठी कुलगुरूंनी रचलेले हे षड्यंत्र असल्याचा आरोपही केला. यामुळे विद्यापीठासमोर अनेक वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिसांनी एनएसयुआय व राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये अजित सिंह, अमिन नुरी, शैलेंद्र तिवारी यांचा समावेश होता. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अभाविपची बाजीराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पार पडलेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीमध्ये अभाविपने विजय मिळविला. विद्यार्थी परिषदेच्या १५ ही प्रतिनिधींनी अभाविपला समर्थन देत अध्यक्षपदी विद्यापीठ विधी महाविद्यालयाचा आशिष मोहिते व सचिवपदी भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा आकाश थानथराटे यांना बिनविरोध निवडून दिले. अभाविपचा दणदणीत विजय झाल्याने व्यवस्थापन परिषदेचा मार्ग सुकर झाला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन