Vidhan Sabha Election 2019; only 12 days for promotion | Vidhan Sabha Election 2019; १२ दिवसांचाच प्रचार
Vidhan Sabha Election 2019; १२ दिवसांचाच प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे.
साधारणपणे ४५ दिवसाच्या आत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. राज्यात यंदा ही प्रक्रिया ३० दिवसातच पार पडणार आहे. तसा कार्यक्रम निवडणूक विभागाने निश्चित केला आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. त्याच दिवसापासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. ४ ऑक्टोबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून त्याच दिवशी आघाडी, अपक्षांना चिन्हही वाटप होईल. त्यामुळे ८ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होईल. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने १९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचार करता येईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने १२ दिवसच प्रचाराला मिळणार आहेत. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.


Web Title: Vidhan Sabha Election 2019; only 12 days for promotion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.