शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नागपूर विधानभवन सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:28 IST

येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.

ठळक मुद्देविधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू : सचिव स्तरावरील अधिकारी १ जुलैला येणार

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईहून कर्मचारी दाखल झाले असून सचिव स्तरावरील अधिकारी हे १ जुलैला येतील. विधिमंडळ सचिवालयाचे ग्रंथालय, प्रश्न शाखा सुरू झाल्या आहेत. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून आॅनलाईन तारांकित प्रश्न स्वीकारण्यासही सुरुवात झाली आहे. २८ जूनपासून लक्ष्यवेधी स्वीकारण्यात येतील. विविध कागदपत्रे, फायली तयार करण्यात येत आहे. तीन आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज तहकूब होईल. कामाचे तास वाढावे, जास्तीत जास्त कामकाज व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची परंपरा खंडित करून इतर कामकाजातही गोंधळ होणार नाही, यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते. विधानभवनात रेलचेल वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे.ग्रंथालय सुरूअधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळाचे ग्रंथालय सुरू झाले आहे. ग्रंथालयात विधिमंडळाशी संबंधित स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आतापर्यंतचे जवळपास सर्व संदर्भ ग्रंथालयात उपलब्ध आहे. पीएचडी करणाऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ग्रंथालयाचे कामकाज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.चौथे पावसाळी अधिवेशनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील पहिले पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. यापूर्वी तीन पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पावसाळी अधिवेशन नागपूर येथे झाले होते. त्यावेळी अधिवेशन २५ दिवस चालले होते. त्यानंतर वसंतराव नाईक मुुख्यमंत्री असताना १९६६ ला पावसाळी अधिवेशन झाले होते. २६ दिवस अधिवेशन चालले होते. त्यानंतर १९६८ ला पुन्हा पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळीही वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर