शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

Video : नागपूरात ‘सिंबायोसिस’ विद्यापीठ, विद्यार्थ्यांना फी मध्ये 15 टक्के सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 22:37 IST

नितीन गडकरी : ‘सिंबॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नागपूर कॅम्पस’चे थाटात उद्घाटन

ठळक मुद्देवाठोडा परिसरात सुमारे ७५ एकरावर असलेल्या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित असून शैक्षणिक शुल्कातही १५ टक्के सवलत उपलब्ध आहे.

नागपूर : उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या स्थापनेमुळे ‘एज्यूकेशन हब’ म्हणून उदयास येणाऱ्या उपराजधानी नागपुरात ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामुळे इथल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले. 

वाठोडा परिसरात सुमारे ७५ एकरावर असलेल्या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपूर कॅम्पसचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधिर मुनंगटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शं. बा. मुजुमदार, उपकुलगुरू डॉ. विजया येरवडेकर, महापौर नंदा जिचकार, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपास्थित होते.पूर्वी विदर्भातून राज्याच्या इतर भागात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात होते. पण आता नागपूरध्येच या सर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित असून शैक्षणिक शुल्कातही १५ टक्के सवलत उपलब्ध आहे. ही सवलत संपूर्ण विदर्भाकरिता लागू करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते निधीमघून २० कोटीची तरतूद करून विद्यापीठाकडे येण्यासाठीच्या रस्त्याचे सिंमेट काँक्रेटीकरण करण्यात येईल व या परिसरात मेट्रो स्टेशन आल्याने येथे सहज पोहोचता येईल. विद्यापीठ परिसरात ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करून रस्त्यालगत सौंदर्यीकरणाची जबाबदारी विद्यापीठाने उचलावी, असेही गडकरी म्हणाले. शैक्षणिक संस्थामध्ये दिल्या जाणाºया गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच युवाशक्तीचे रूपांतर मानव संसाधनामध्ये होऊ शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. 

हे आहेत अभ्यासक्रम 

‘सिंबायोसिस’मध्ये सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मँनेजमेंट, लॉ स्कूल, स्कूल ऑफ प्लानिंग, ऑर्किटेक्चर अँड डिझाईन या ३ संस्था सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये एम. बी.ए, बी.बी.ए, बी.आर्क, एल.एल.बी व एल. एल. एम. हे अभ्यासक्रम जून-२०१९ या सत्रापासून सुरु करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :nagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsymbiosisसिंबायोसिस