नीतेश राणेंविरोधात सरसावले विदर्भवादी

By Admin | Updated: August 26, 2016 02:55 IST2016-08-26T02:55:00+5:302016-08-26T02:55:00+5:30

राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे

Vidarbhavati, who is against Nitesh Rane | नीतेश राणेंविरोधात सरसावले विदर्भवादी

नीतेश राणेंविरोधात सरसावले विदर्भवादी

पोलिसांत तक्रारी दाखल : मारण्याची धमकी दिल्याबद्दल अटक करा
नागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात विदर्भवादी सरसावले आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. मारण्याची धमकी देणाऱ्या राणे यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी नीतेश राणे यांचा हिंगणघाट येथे पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
नीतेश राणे बुधवारी नागपुरात आले असताना त्यांनी विदर्भवाद्यांवर जोरदार टीका करीत वेळ पडली तर मार देण्याची भाषा वापरली होती. यासंदर्भात सुरुवातीला विदर्भवाद्यांनी राणे यांच्याकडे दुर्लक्षच करण्याची भूमिका घेतली होती. परंतु गुरुवारी मात्र विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवाद्यांनी राणेंविरोधात पोलीस तक्रार केली. नीतेश राणे यांनी भडकावू वक्तव्य केले असून विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी विदर्भवाद्यांची मागणी आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी नीतेश राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आला. वणी, साकोली, तुमसर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या. (प्रतिनिधी)

वैदर्भीयांचा हिसका दाखवणार
आ. नीतेश राणे यांनी विदर्भवाद्यांबाबत सार्वजनिकरीत्या जी असभ्य भाषा वापरली आहे, त्यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसनेसुद्धा त्यांना आवरावे. यापुढे नीतेश राणे यांनी विदर्भवाद्यांबाबत अशी भाषा वापरल्यास त्यांना वैदर्भीय हिसका दाखवला जाईल. तसेच त्यांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली जाईल.
राम नेवले, संयोजक,
विदर्भ राज्य आंदोलन समिती

Web Title: Vidarbhavati, who is against Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.