विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 03:00 IST2016-09-04T03:00:46+5:302016-09-04T03:00:46+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गेल्यावर्षीप्रमाणे

Vidarbha's replica assembly Nagpur | विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात

विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पुढाकार : तयारीचा आढावा
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३ व ४ आॅक्टोबर रोजी विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात भरविण्यात येणार आहे. सोबतच अखंड महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोध करणार असून ५ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या दोन दिवसीय प्रतिरूप विधानसभेच्या पूर्व तयारीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या गिरीपेठ येतील मुख्य कार्यालयात कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभाकरराव कोहळे होते. समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, अरुण केदार, श्याम वाघ, अनिल तिडके, दिलीप नरवडिया, विष्णू आष्टीकर, डॉ. दीपक मुंडे, चंद्रकांत पांडे आदी प्रमुख्याने उपस्थित होते.
दोन दिवसाच्या विदर्भाच्या विधानसभेमध्ये विदर्भाच्या विकासाचे मॉडेल सादर करण्यात येणार आहे. विदर्भ राज्याच्या फायद्याचा अर्थसंकल्प मांडून विदर्भ राज्य कसे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, हे सांगण्यात येणार आहे. सोबतच विदर्भात औद्योगिकीकरण व रोजगार कसे वाढेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नक्षलवाद, कुपोषण कसे संपेल, ११ ही जिल्ह्यांचा संतुलित विकास कसा होईल, विदर्भातील विजेचे लोडशेडिंग संपवून विजेचे दर निम्म्यावर कसे आणल्या जातील याचाही निर्णय या विधानसभेत होईल. विदर्भ राज्य हे देशातील नंबर एकचे प्रगतीशील राज्य कसे होऊ शकते हेही या विधानसभेत मांडल्या जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची विधानसभा ५ डिसेंबरला नागपूरला भरेल, त्या विधानसभेला विदर्भ राज्य आंदोलन समिती विरोध करणार आहे. यासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीला भीमराव फुसे, चंद्रकांत पांडे, तुकाराम घुमे, बाबा राठोड, मोहन राठी, अरुण खंगार, सुधा पावडे, वसंतराव वैद्य, अभय चैधरी, दिलीप कोहळे, बाबुराव गेडाम, बंडू कुहिटे, विनायक खोरगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जनजागृतीसाठी विदर्भात ३०० सभा
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी विदर्भात ३०० सभा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सिंदखेडराजा, कालेश्वर गडचिरोली, उमरखेड, गाडगेबाबांचे जन्मगाव शेंडगाव (अकोला), देवरी (गोंदिया) येथून विदर्भ दिंडी काढण्यात येईल. विदर्भ राज्याचा गजर करीत या दिंड्या ५ डिसेंबरला नागपुरात पोहोचतील.

Web Title: Vidarbha's replica assembly Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.