शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

विदर्भाच्या वैद्यकीय शास्त्रज्ञाची जागतिक भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:14 IST

विदर्भातील मातीत जन्माला आलेल्या एका तरुणाने आज देशातील एक प्रमुख वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहेच. परंतु आपल्या कर्तृत्वाने त्याने जागतिक पातळीवर आपले नाव कोरत देशाचे नावही उंचावले आहे. अलीकडेच त्यांना ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित वेलकम ट्रस्ट इंडिया अलायन्सतर्फे ‘इंटर क्लिनिकल अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ इंटर मिडिएट फेलोशीप प्राप्त झाली आहे. या फेलोशिप अंतर्गत ते गर्भाशय संबंधित आजारावर ऑस्ट्रेलियात संशोधन करणार आहेत. पाच वर्षासाठी असलेली ही फेलोशिप असून याअंतर्गत संशोधन करणाऱ्यांना तब्बल साडे तीन कोटी रुपयांपर्यंतचा खर्च संस्था करते. ही फेलोशिप मिळवणारे ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतील एकमेव शास्त्रज्ञ आहेत, हे विशेष.

ठळक मुद्देराहुल गजभिये यांना ऑस्ट्रेलियाची फेलोशिप : गर्भाशय संबंधित आजारावर करणार संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील मातीत जन्माला आलेल्या एका तरुणाने आज देशातील एक प्रमुख वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहेच. परंतु आपल्या कर्तृत्वाने त्याने जागतिक पातळीवर आपले नाव कोरत देशाचे नावही उंचावले आहे. अलीकडेच त्यांना ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित वेलकम ट्रस्ट इंडिया अलायन्सतर्फे ‘इंटर क्लिनिकल अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ इंटर मिडिएट फेलोशीप प्राप्त झाली आहे. या फेलोशिप अंतर्गत ते गर्भाशय संबंधित आजारावर ऑस्ट्रेलियात संशोधन करणार आहेत. पाच वर्षासाठी असलेली ही फेलोशिप असून याअंतर्गत संशोधन करणाऱ्यांना तब्बल साडे तीन कोटी रुपयांपर्यंतचा खर्च संस्था करते. ही फेलोशिप मिळवणारे ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतील एकमेव शास्त्रज्ञ आहेत, हे विशेष.डॉ. राहुल गजभिये असे या वैदर्भीय शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते मूळचे भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील रहिवासी आहेत. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण प्राप्त केले आहे. तर मुंबई विद्यापीठातून अ‍ॅप्लिकेशन बायोलॉजीमध्ये त्यांनी पीएचडी केली आहे. काही वर्षे वैद्यकीय सेवा केल्यानंर त्यांनी संशोधनावरच लक्ष केंद्रीत केले. ते सध्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), राष्ट्रीय संशोधन संस्था (एनआयआरआरएच) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार येथे वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (आयएनएसए) इंडो-ऑस्ट्रेलिया ईएमसीआर फेलोशिप, बरास वेलकम फेलोशिप यासह प्रतिष्ठित फेलोशिप त्यांनी प्राप्त केली आहे. ते ऑस्ट्रेलियातील क्वीनलॅण्ड विद्यापीठात आण्विक बायोसाईन्स संस्थेत सहभागी झाले होते. डॉ. गजभिये यांना आंतरराष्ट्रीय डब्ल्यूएचओ आणि राष्ट्रीय निधी एजन्सीज (आयसीएमआर, डीबीटी, डीएसटी आणि डीएई)कडून संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. ते सध्या एन्डोमेट्रोओपिसीसच्या पॅथोजेनेसिसवर लक्ष केंद्रीत केलेल्या शोध कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. एंडोमेट्रोपिसीसचे निदान करण्यासाठी नॉन इनवेसिव्ह मार्कर, एंडोमेट्रोसिससह भारतीय स्त्रियांमध्ये गर्भधारणा परिणाम, एंडोमेट्रोपीसिसाठी अनुवांशिक जोखीम आणि एंडोमेट्रोसिस आणि डिंबग्रंथी कर्करोगाच्या दरम्यानचे संबंध यावर त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नरमध्ये शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.डब्ल्यूूईएसचे आंतरराष्ट्रीय राजदूतडॉ. राहुल गजभिये हे वर्ल्ड एन्डोमेट्रोसिस सोसायटी (डब्ल्यूईएस) आणि एंडोमेट्रॉयसिस सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ प्रोडक्शन अ‍ॅण्ड प्रजननचे ते आजीवन सदस्य असून २०१८ पासून त्यांची यासंघटनेतर्फे राजदूत म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिटच्या रिसर्च अ‍ॅडव्हायजरी कमिटीचे माजी सदस्य आहेत. राज्यात एमआरएचआरयू स्थापन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ते वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य सचिव आणि आयसीएमआर-एनआयआरआरएच फिल्ड युनिट्सच्या प्रकल्प गटातही होते. देशभरातील आयसीएमआर-एनआयआरआरएचच्या ३१ फिल्ड युनिट्समध्ये संशोधन कार्यक्रमाचे ते समन्वयक होते.सामाजिक कार्यातही अग्रेसरडॉ. राहुल गजभिये हे देशातील एक प्रमुख वैद्यकीय संशोधक असून त्यांचा प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. असे असले तरी समाजाबद्दलही आपण काही देणे लागतो, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. तरुणांना करिअर मार्गदर्शन ते करीत असतात. यासोबतच अनेक सामाजिक कामातही त्यांचा सहभाग असतो.

टॅग्स :Vidarbhaविदर्भMedicalवैद्यकीयscienceविज्ञान