विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर; धरणांमध्ये ३४ टक्केच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:15 PM2018-01-02T14:15:57+5:302018-01-02T14:16:29+5:30

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

Vidarbha at the threshold of water conservation; 34 percent water storage in dams | विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर; धरणांमध्ये ३४ टक्केच पाणीसाठा

विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर; धरणांमध्ये ३४ टक्केच पाणीसाठा

Next
ठळक मुद्देनागपूर विभागात ३५ टक्के तर अमरावती विभागात ३३ टक्के जलसाठा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला पेंच धरणाचा मोठा आधार आहे. पण मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरण पुरेसे भरलेले नाही. त्यामुळे नागपूर शहराला पुरवठा होणाºया पिण्याच्या पाण्यावरही काही प्रमाणात निर्बंध यायला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमध्ये असलेला मर्यादीत पाणीसाठा विचारात घेता नागपुरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगतानाच महापालिकेकडून नागपूरकरांना देण्यात येणाºया पाण्याचे आॅडीट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगीतले.
राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्केपाणी साठा शिल्लक आहे. तर विदर्भात अवघा ३२.३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या तुलनेत सध्या विदभार्तील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन हिवाळ्यातच विदर्भातील बºयाच भागात पाणीटंचाईची झळ पोहोचायला लागली आहे. नागपूर सारख्या शहरात पाणीपुरवठा करणाºया टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. जे पाणी शिल्लक आहे. ते पिण्यासाठी पुरेसे आहे. असे सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात पण आणिबाणीप्रमाणे काटकसर करून पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्लाही सिंचन विभाग देत आहे. येत्या पावसाळयापर्यंत ही पाणीटंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातील एकूण ;मोठी मध्यम लघु धरणांची संख्या आणि पाणीसाठा
विभाग धरणे                 सध्याचा पाणीसाठा                       गेल्या वर्षातील पाणीसाठा
नागपूर                          ३८५ ३०.२५ टक्के                       ४३.७० टक्के
अमरावती                      ४४३ ३३.६७ टक्के                        ६१.७९ टक्के

नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या किती आहे पाणीसाठा
जिल्हा धरण                         सध्याचा पाणीसाठा                               गेल्या वर्षाचा पाणीसाठा
नागपूर कामठी खैरी              ३७.६४ टक्के                                        ४३.५० टक्के
नागपूर तोतलाडोह                 २१.६२ टक्के                                         ३८.४३ टक्के
नागपूर खिंडसी                     २० टक्के
भंडारा गोसीखूर्द                   २०.३८ टक्के
गोंदिया इटियाडोह                   ३२.६४ टक्के                                       ८८.३९ टक्के

 

Web Title: Vidarbha at the threshold of water conservation; 34 percent water storage in dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी