विदर्भ वैधानिक मंडळाचे कार्यालय दयनीय
By Admin | Updated: June 20, 2014 01:03 IST2014-06-20T01:03:15+5:302014-06-20T01:03:15+5:30
विदर्भ वैधानिक विकास मंडळ कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. मंडळाने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून येथे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली आहे.

विदर्भ वैधानिक मंडळाचे कार्यालय दयनीय
कमल शर्मा - नागपूर
विदर्भ वैधानिक विकास मंडळ कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. मंडळाने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून येथे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली आहे.
मंडळाच्या कार्यालय परिसरात भव्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर मंडळाचे कार्यालय तेथे स्थानांतरित होणार आहे. मात्र कार्यालयाची सध्याची अवस्था फारच दयनीय आहे. इमारतीच्या मागचा भाग गळत असून सभागृहाची अवस्थाही चांगली नाही.
केंव्हा एकदा नवीन इमारत तयार होते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाच्या सचिवांनी अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र पाठविले असून त्यात जुन्या इमारतीच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे मंडळाचे संचालक श्रीकांत धर्माळे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)