शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना सबसिडीचा झटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 10:47 AM

विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले.

ठळक मुद्दे१२०० कोटी संपले महावितरणला हवे ३०० कोटी

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले. वर्ष २०१९-२० मध्ये उद्योगांना दिलासा देण्यासाठी १२०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम आता संपली आहे. महावितरणने दिलासा कायम ठेवण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून हा निधी न मिळाल्यास विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना तगडा झटका लागण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने विदर्भ-मराठवाडा या दोन्ही विभागांतील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी वीज बिलात दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकार महावितरणला सबसिडी देत आहे. ३१ मार्च रोजी संपत असलेल्या आर्थिक वर्षासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. परंतु हा फेब्रुवारी महिन्यातच संपला. अशा परिस्थितीत महावितरणने मार्चमध्ये जारी होणाऱ्या वीज बिलात दिलासा देण्यासाठी ३०० कोटी रुपयाची मागणी केली आहे. परंतु राज्य सरकारने आतापर्यंत पैसे जारी केलेले नाही. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना बसत आहे. विदर्भात ३०२४ उद्योगांकडे एचटी कनेक्शन आहे. मराठवाड्यात ही संख्या २१०४ आहे. याशिवाय एल.टी. लाईनवरूनही अनेक उद्योगांना सबसिडी मिळते. परंतु उद्योगांना दिलासा देण्यासोबतच वीज बिलसुद्धा अडकले आहेत. दर महिन्याच्या चार तारखेपूर्वी बिल मिळणारे उद्योग अजूनही याची प्रतीक्षा करीत आहेत.

अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने वाढली चिंताराज्य सरकार विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अर्थसंकल्पीय तरतूद करीत आहे. २०१९-२० मध्येही १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु वर्ष २०२०-२१ साठी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अशी तरतूद करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर मार्चमधील वीज बिलसुद्धा जारी झालेले नाहीत. यामुळे उद्योजक चिंतेत पडले आहेत. असे असले तरी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा कायम राहण्याची घोषणा केलेली आहे.

सोमवारपासून होणार बिल वाटप - महावितरणयासंदर्भात महावितरणचे म्हणणे आहे की, राज्य सरकारकडून निधी मिळाल्यावरच ते उद्योगांना दिलासा देऊ शकतात. मार्चमध्ये सबसिडी देण्यासाठी ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत निधी मिळाल्यास बिल वाटपाची प्रक्रिया सुरु केली जाईल.

उद्योगांना प्रोत्साहन मिळत राहायला हवे - व्हीआयएविदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष आर.बी. गोयंका यांनी सांगितले की, विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा कायम ठेवायला हवा. या भरवशावरच उद्योगांना विशेषत: टेक्स्टाईल उद्योगांना विस्तार करण्याची योजना आखली आहे. सबसिडी बंद होताच यालाही फटका बसेल.

टॅग्स :electricityवीज