शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

निधी वाटप ‘फार्म्युल्या’ने झाले विदर्भ-मराठवाड्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:17 AM

विकास मंडळांतर्गत विदर्भ व मराठवाड्यासाठी असलेल्या निधी वाटप फॉर्म्युल्याला विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायण यांनी आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देकपिल चंद्रायण यांनी लिहिले राज्यपालांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास मंडळांतर्गत विदर्भ व मराठवाड्यासाठी असलेल्या निधी वाटप फॉर्म्युल्याला विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायण यांनी आव्हान दिले आहे. या फॉर्म्युल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अजूनही पुणे विभागालाच सर्वाधिक वाटप होत आहे.चंद्रायण यांनी राज्यपालांना पत्र लिहून या फॉर्म्युल्यामध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सिंचन विकासासाठी निधी वाटप करण्यासाठी राज्यपाल क्षेत्रवार निकष देतात. अर्थसंकल्पात त्याचे पालन केले जाते. या निकषामंध्ये संबंधित क्षेत्रातील लोकसंख्या हा आधार धरला जातो. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेशालाच याचा सर्वाधिक लाभ मिळतो. विदर्भ व मराठवाड्याला आवश्यक निधी मिळत नाही.चंद्रायण यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला सुचविला आहे. तो म्हणजे शहरी लोकसंख्या ऐवजी केवळ ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेण्यात यावी. पेरणी लायक क्षेत्राला २५ टक्के प्राथमिकता देण्यात यावी. २५ टक्के हे सिंचन क्षेत्राच्या उपलब्धतेलाही धरले जावे. हे पत्र त्यांनी २० फेब्रुवारी रोजी लिहिले आहे. यासंबंधात राज्यपाल कार्यालयातील अधिकाऱ्याशी मौखिक चर्चा झाली आहे. हे पत्र अर्थसंकल्पाच्या काही दिवसापूर्वीच पाठवल्याने या वर्षात यावर पुढाकार घेण्यात आलेला नाही. पुढच्या वर्षी या फॉर्म्युल्यावर चर्चा होऊ शकते.

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळ