शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यात रोजगार निर्मीती कार्यक्रमात विदर्भ आघाडीवर

By आनंद डेकाटे | Updated: April 3, 2025 18:55 IST

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : अमरावती विभाग १०८.४५ तर नागपूर विभागाचे १०२.१९ टक्के उद्दीष्ट पूर्ण

आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच उद्योजकतेला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा विदर्भातीलअमरावती व नागपूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. अमरावती विभागाला दिलेल्या उद्दीष्टापैकी ३,७८६ म्हणजेच १०८.४५ टक्के तर नागपूर विभागात ३,६३६ म्हणजेच १०२.१९ टक्के स्वयंरोजगार प्रकल्पांना कर्जपूरवठा मंजूर झाला आहे.

राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल संस्था म्हणून उद्योग विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी २५ हजार युवकांना लाभ देण्यासाठी उद्दष्ट ठरविण्यात आले आहे. याअंतर्गत १ लाख २५ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या योजनेंतर्गत विविध उद्योगांसोबतच सेवा क्षेत्रातील उद्योगासाठी या योजनेमार्फत ५० लाख रूपयांपर्यंत विविध बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदानाचा समावेश आहे.

नागपूर विभागाची स्थितीमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागासाठी ३,५५८ युवकांना लाभ देण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३१ मार्च पर्यंत ३,६३६ विविध प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. शंभर टक्केपेक्षा जास्त उद्दीष्ट पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर १३५.३८ टक्के, नागपूर १०९.६८ टक्के,वर्धा १०१.८७ टक्के, गडचिरोली १०१.६८ टक्के, गोंदिया ७९.२४ टक्के तर भंडारा जिल्ह्यात ६३.१८ टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती उद्योग सह संचालक गजेंद्र भारती यांनी दिली.

अमरावती राज्यात आघाडीवरमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अमरावती विभाग राज्यात आघाडीवर आहे. अमरावती विभागाला ३४९१ प्रकल्प मंजूरीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या उद्दीष्टांपैकी विभागाने ३,७८६ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. विभागाने १०८.४५ टक्के उद्दीष्टपूर्ती केली आहे. अमरावती विभागात दिलेल्या उद्दीष्टांपैकी सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात १२१.९८ टक्के, अमरावती जिल्ह्यात १०७.६९ टक्के, अकोला जिल्ह्यात १०६.०१ टक्के, वाशिम जिल्ह्यात १०४.०५ टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात १०१.५० टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भAmravatiअमरावती