विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा

By Admin | Updated: November 29, 2015 03:40 IST2015-11-29T03:40:26+5:302015-11-29T03:40:26+5:30

देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही.

Vidarbha independent, BJP should teach the lesson to Shivsena | विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा

विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा

गेव्ह आवारी : ‘वेगळा विदर्भ किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याख्यान
नागपूर : देशाच्या स्वातंत्र्यापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे.परंतु वेळोवेळी कोणत्यातरी कारणामुळे ही मागणी पूर्ण झाली नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानुसार विदर्भ स्वतंत्र करून भाजपने शिवसेनेला धडा शिकवावा, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी शनिवारी केले. जनमंचतर्फे धनवटे सभागृहात आयोजित ‘वेगळा विदर्भ, किती जवळ, किती दूर’ या विषयावर व्याखान देताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जनमंचचे सल्लागार शरद पाटील होते. अध्यक्ष अनिल किलोर ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, जनमंचचे सचिव राजीव जगताप आदी व्यासपीठावर होते. विदर्भाच्या मागणीसाठी एक दबाव निर्माण झाला आहे. जनमंचने स्वतंत्र विदर्भाची चळळ हाती घेतली आहे. आपण सर्व विदर्भवादी आहोत. भाजपच्या हातात केंद्र व राज्यातील सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जोर लावला तर विदर्भाची निर्मिती होऊ शकते. या निर्णयाला आमचाही पाठिंबा राहील, अशी ग्वाही आवारी यांनी दिली.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५७-५८ च्या सुमारास विदर्भाची चळवळ जोमात होती. काँग्रेसचे नेते विदर्भवादी होते. परंतु यशवतंराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी त्याग करा, असे आवाहन केले. पुढे भाषावादाचा मुद्दा पुढे करून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. विदर्भ स्वतंत्र झाला तर मागास राहील. असे सांगितले जाते. परंतु यात तथ्य नाही. लहानशा स्वार्थासाठी तडजोड न करता नेत्यांची त्याग करण्याची तयारी असावी. आत्मविश्वास बाळगा, विदर्भाच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्यास स्वतंत्र विदर्भाच्या निमिर्तीला कोणीही रोखू शकणार नाही. असे मत प्रकाश दुबे यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनाही स्वतंत्र विदर्भ हवा आहे. शिवसेनेसोबत भाजप फार काळ सत्तेत राहणार नाही. अगामी निवडणुकीपूर्वी २०१८मध्ये स्वतंत्र विदर्भाची घोषणा होईल, असे भाकीत शरद पाटील यांनी केले. अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून जनमंचने विदर्भाच्या मुद्यावर घेतलेल्या कौलात विदर्भातील नागरिक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. परंतु जेव्हाजेव्हा विदर्भाची मागणी पुढे आली तेव्हा तेव्हा या मागणीला बगल देण्यात आल्याचे अनिल किलोर यांनी प्रस्ताविकातून सांगितले. संचालन सुहास खांडेकर यांनी तर आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha independent, BJP should teach the lesson to Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.