ं‘यूपीएससी’त विदर्भाचा झेंडा
By Admin | Updated: July 5, 2015 02:45 IST2015-07-05T02:45:03+5:302015-07-05T02:45:03+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवा परीक्षेत (यूपीएससी) विदर्भातील उमेदवारांनी चांगले यश संपादन केले आहे.

ं‘यूपीएससी’त विदर्भाचा झेंडा
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवा परीक्षेत (यूपीएससी) विदर्भातील उमेदवारांनी चांगले यश संपादन केले आहे. नागपुरातील प्रशासकीय सेवापूर्व परीक्षा केंद्रातून मार्गदर्शन घेतलेल्या पाच विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. यातील आवेश तितरमारे याने विदर्भातून प्रथम तर गोंदिया येथील स्वप्नील चौधरी याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये नागपूरचे आवेश तितरमारे (६१३), संदीप मोहुर्ले (७३०), हेमंत शिरसाट (८१४), श्वेता पाटील (८३५) तसेच गौरव माळवी (१०५७) यांचा समावेश आहे. गोंदिया येथील स्वप्नील चौधरी (६८३) तर अमरावती येथील स्वप्नील वानखडे (७७९) यांनीदेखील यश मिळविले आहे. नागपुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी इतर केंद्रांच्या तुलनेत चांगले यश मिळविले आहे. डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या १० विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते, यातील ५ यशस्वी झाले, अशी माहिती नागपूरच्या केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. महेंद्र साळुंके यांनी दिली. अमरावती येथे नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (टॉपर्स टॉक/२ वर)
‘एनएडीटी’तील प्रशिक्षणार्थ्यांचे यश
‘यूपीएससी’चे निकाल जाहीर होताच ‘एनएडीटी’मध्ये (नॅशनल अकॅडमी आॅफ डायरेक्ट टॅक्सेस) उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यशस्वी झालेल्या प्रथम १०० उमेदवारांमध्ये येथील १८ प्रशिक्षणार्थी आहेत. यात देशात पाचव्या क्रमांकावर असलेल्या सुहर्षा भगतचा समावेश आहे. केंद्रीयस्तरावर ७८ वी व राज्यात प्रथम आलेली अबोली नरवणे ही देखील ‘एनएडीटी’ची प्रशिक्षणार्थी आहे. सोबतच राज्यातून तृतीय आलेला अभिजित शिवाले तसेच शहरातून अव्वल असलेला आवेश तितरमारे हे देखील येथेच प्रशिक्षण घेत आहेत.